त्या सकाळी डोळे उघडले तेव्हा काळजात धडधडत होते . सकाळच्या थंड कोवळ्या वाऱ्यात ही घाम फुटत होता. भीतीने मन कवर-बावरं झालं होतं. पाहिलेलं स्वप्न खरं ठरलं तर? थोडा वेळ कशाचाच भान नव्हता. उशी खाली ठेवलेला mobile phone काढला आणि त्याचा number dial केला. पण कुणीच उत्तर दिले नाही. गेले काही दिवस असच काहीसं चाललय. त्याला call करते पण तो उत्तर देत नाही. आज मात्र गप्प बसता येणार नाही. खरं काय ते कळायलाच पाहिजे. म्हणून आज मी त्याला भेटण्याचा निर्णय घेतला. तो येऊ शकत नसेल पण मी तर जाऊ शकते ना.
पटकन तयारीला लागले. नाश्ता होई पर्यंत काय घालायचे, कसे जायचे या सगळ्या गोष्टींचे विचार चालू होते. ठरलं तर. त्याला लाल रंग आवडतो म्हणून लाल रंगाचे एखादे t-shirt किंवा top घालावा. पण नंतर वाटले, ३ महिन्या नंतर त्याला भेटणार. चांगलं दिसायला हवं म्हणून ethnic wear असावं. मग फिरत-फिरत गाडी सलवार कमीज वर येऊन थांबली. मुलगीच ना मी. कपडे झाले की त्यावर साजेसं गळ्यातलं, कानातले आणि सलवार कमीज म्हणजे हातात कमीत कमी डझन दोन डझन बांगड्या ही हव्यात. मग टिकली कशी विसरायची! सकाळचा एक तास असाच निघून गेला. कपड्यांची इस्त्री, handbag, चपला.... चापलांमध्ये पण उंच टाचांच्या घालाव्यात की साध्याच चालतील! किती विचार आणि किती ते पर्याय.
तयारी झाल्यावर शेवटची एक झलक पहावी म्हणून आरश्या समोर उभी राहिले. लाल-हिरव्या dress वर बांगड्या आणि टिकली शोभत होती. necklace आणि ear rings जास्तच झग-मग वाटत होते म्हणून त्यांना काढून ठेवलं. घड्याळात ११ वाजत होते. bus depot मध्ये विचारपूस करताना कळले प्रत्येक १५ मिनिटांवर पुण्याला जाणाऱ्या गाड्या आहेत. पण पुण्यात कुठे? ते काही माहित नाही. राहू दे... तिथे पोहोचल्यावर, त्यालाच call करून विचारेन. जेव्हा त्याला कळेल की मी इतक्या लांबून त्याला भेटायला आली आहे , तर तो मला टाळूच शकत नाही. गाडीची वाट पाहत उभी असताना, त्याला भेटण्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. मनात भीती होती, कदाचित त्याला आवडले नाही तर? आणि पुढच्या क्षणी वाटे की असे काही नाही. तो समजून घेईल. गाडी फलाटावर लागली. bus क्रमांक, ठिकाणाची उद्घोषणा झाली. माझ्या चेहऱ्यावर हसू फुटले. मनात आनंद मावेनासा झाला.
गाडीवर लागलेली पाटी परत वाचली आणि गाडीमध्ये चढले. नशिबाने खिडकी जवळची जागा मिळाली. दुपारची वेळ म्हणून गर्दी नव्हती. प्रवास सुरु झाला. गाडी महामार्गाने जाणार होती. आज वर कधी हा नवीन महामार्ग पहायचा योग आला नव्हता. आजचा दिवस अतिशय भाग्यशाली असावा म्हणून तर आज इतक्या चांगल्या गोष्टी घडत आहेत. खिडकी बाहेरचा निसर्ग डोळ्यांना सुखावत होता. पावसाचा ऋतू होता. सगळीकडे हिरवळ दाटली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला हिरवे शेत, लहान खेडे, डोंगर, दऱ्या व मन हेरावणारे धबधबे होते. छान गार वारा लागत होता. डोळे बंद करून मातीचा सुगंध अनुभवत होते. डोळे झाकताच, त्याची छवी डोळ्यांत नांदू लागली.
आमची सर्वात पहिली संध्याकाळ आठवली. जेव्हा तो पुण्यावरून फक्त ४ तास माझ्या सहवासात घालवायला, कुणाला न सांगता, भेटायास आला होता. एका बाकड्यावर बसून पूर्ण संध्याकाळ काढली. जेव्हा त्याची निघायची वेळ आली, तेव्हा कसं-बसं होत होतं. हे प्रेम का? असं मी विचार करत होते. पण उत्तर काही सापडले नाही. तेवड्यात conductor ने ticket म्हणून स्वप्नांच्या महामार्गावर गती रोधक लावला. हातातलं पुस्तक तसच होतं. वाचायची इच्छा होत नव्हती. mobile काढून सारखी पाहत होती पण त्याचा call किंवा sms नव्हता. असा किती कामात आहे हा!
खोपोलीचा टोल नाका लागला आणि ओळखीचा फाटा दिसला. दूरवर माथेरानचा डोंगर दिसत होता. पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. पावसाळ्यात त्यानं झाड-वेलींची चादर ओढली होती.
खोपोलीचा टोल नाका लागला आणि ओळखीचा फाटा दिसला. दूरवर माथेरानचा डोंगर दिसत होता. पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. पावसाळ्यात त्यानं झाड-वेलींची चादर ओढली होती.
एके दुपारी अचानक call करून बोलवून घेतले आणि माथेरानला जायचं का असं विचारू लागला.classes, घर आणि office मध्ये फिरायला वेळच मिळत नाही. मग संधी चालून आली आहे तर का जाऊ नये? म्हणून हो म्हणले आणि आमची स्वारी निघाली माथेरानला भेटायास. धगधगत्या उन्हात अर्धा रस्ता चढून गाडीची मोटार तापली होती. गाडी सावलीत लावली आणि bonnet उघडलं. आजू-बाजूच्या परिसरात थोडा फेर-फटका केला. रस्त्याच्या बाजूने जाणारी toy train चे tracks होते. अर्धा पाउण तासानंतर पुन्हा पुढचा प्रवास सुरु झाला. तो सतत बोलत होता. हा अमुक स्टोप ती तमुक जागा. मला त्यातील नावं तर लक्षात नाही पण त्याचं वर्णन चालू होतं. "लहान पणा पासून मी कित्येकदा इथे येऊन गेलोय" असं सारखं म्हणत होता.
मग एका टप्या नंतर वाहने नेण्यास बंदी होती. तर पुढचा रस्ता पाई जायचा होता. जंगल तर म्हणणार नाही पण झाडे दाट होती. त्यातील पाउल वाट.... भर उन्हात ही थंड सावली होती. पायाशी लाल मऊ माती होती. प्रत्येक पाउला सोबत लाल माती उडून माझ्या jeans वर बसत होती. यशच्या म्हणण्यावर मी pant ला थोडं वर आवरले.
थोडे दूर वर जाऊन 'पाय दुखताहेत' असा बहाणा केला आणि चपला हातात धरून उभी राहिले. पण माझे ऐकेल तर तो यश कसा? आधी तर मला चप्पल काढू देत नव्हता आणि नंतर स्वतःची चप्पल घालत नव्हता. मला त्या मऊ मातीवर मोकळ्या पायाने चालायचं होतं म्हणून इतके नखरे चालू होते. आणि तो माझ्या सगळ्या प्रयत्नांवर मात करत होता. मी त्याला म्हणाली, "चपला पायाला लागत आहेत." तर बळजबरीने स्वतःच्या चपला माझ्या पायात घालू लागला. मग मला खरं काय ते सांगावं लागलं. "मला चपला घालायच्या नाही आहेत." आणि मी जागेवर उभी राहिली. तो चालू लागला होता तरी ही वळून मागे आला आणि गंभीरतेने विचारले, "चालणार आहेस की नाही?" मी त्याच्या कडे न पाहता, मान हलवून नकार दिला. बघताच क्षणी, त्याने मला उचलून घेतलं. होता-नव्हता तो राग तिथेच त्याच्या कुशीत विरघळला. हेच प्रेम का?
गाडी आता लोणावळ्यात पोहोचली होती. वाऱ्यात गारवा वाढला होता. रस्ता डोंगराच्या कडेला कोरलेला होता. सगळी कडून छोटे-छोटे धबधबे वाहत रस्त्यावर येत होते. अजून उंचावर जाताच रस्ता ढगांमध्ये हरवला होता. रिम-झीम पाऊस चालू झाला. खिडकीची काच लावली. काचेवारचे टेंब पाहून, संदीप खरेंच्या गाण्याची ओळ आठवली...

"इथे दूर देशी माझ्या, सुन्या खिडकीच्या पाशी,
झाडे सर काच भर सडा,
तूच-तूच, तुझ्या-तुझ्या, तुझी-तुझी, तुझे-तुझे,
सारा-सारा, तुझा-तुझा सडा...."
अशाच थेंबांच्या सड्यात, माझ्याही डोळ्यात पाणी दाटलं होतं....झाडे सर काच भर सडा,
तूच-तूच, तुझ्या-तुझ्या, तुझी-तुझी, तुझे-तुझे,
सारा-सारा, तुझा-तुझा सडा...."
"पण तुला का भेटता येणार नाही?" मी स्वतःचे अश्रू आवरत विचारले.
"आईला संशय आलाय. बाहेर पडणं कठीण दिसतंय" यश म्हणाला.
"हे माझं वाक्य असायला हवं होतं."
"खोटं. साफ खोटं. माझं कंटाळा आलाय ना ?
"नाही गं...."
"मग काय आहे? बोलना...."माझ्या निराशेचं रागात रुपांतर झालं.
त्याने माझ्या दिशेला पाहिलं आणि म्हणाला, "निघ आता. बस झालं."
मला माझा राग आवरला नाही आणि मी त्याच्या कानाखाली एक वाजवली. जे घडलं त्याने क्षण जसे थांबले. नकळत माझे अश्रू सांडू लागले. त्याने माझा चेहरा हातांत घेतला.
"अगं वेडा बाई.... रडू नका... तू म्हणतेस तसंच होईल."
याला प्रेम म्हणतात का?
आता मला राहवेना. गाडी देहू रोड मार्गे पुणे शहरात पोहोचली. मी त्याला sms करून कळवले. मी शहरात पोहोचे पर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ होईल. मग त्याला आधीच कळवावं. नाही तर हा कुणाबरोबर तरी निघून जायचा आणि उशिरा कळवलं म्हणून माझ्यावर खेकसायचा.
"guess wht? i am at dehu road..."
हा sms त्याला पाठवला आणि आतुरतेने त्याच्या प्रतिक्रियेची वात पाहत होते. वेळ पळत होता पण त्याचं उत्तर काही येत नव्हत. हा जर का असाच करणार आहे तर मला भेटणार कसा? तेवढ्यात किती दिवसानंतर त्याचा number माझ्या mobile screen वर झळकला. माझा चेहरा आनंदाने फुलाला होता आणि त्याच गतीने कोमेजला.
"i can't meet you. you go back."
"i can't meet you. you go back."
या शब्दांत त्याचं उत्तर आलं. आता मला काहीच कळत नव्हतं काय करावं. मी त्याचा निर्णय बदलायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. हा-हा बोलता, गाडी शिवाजी नगरच्या वाहन तळात पोहोचली. या पुढे मी जाऊ शकत नव्हती. कदाचित त्याला थट्टा वाटली असेल. म्हणून मी PCO वरून call केला. या वेळी त्याने माझा call उत्तरला. घाबरुन मला कंठ फुटत नव्हता. तरीही मी त्याला कारण विचारलं.
"मी येऊ शकत नाही. तू दुसरी गाडी पकड आणि परत जा."
"पण का?"
"मला नाही भेटायचं. तू कोणाला विचारून आली आहेस? का आली इथे?"
पुढे त्याचा आवाज ही ऐकावासा वाटत नव्हता. त्याचं बोलणं संपलं आणि दोन्ही बाजूला शांतता झाली. मी ही काही बोलत नव्हती. एखादी मुलगी अशा वेळी कशी बोलणार...? रडेल, चिढेल, ओरडेल, पिसाळेल... काय करणार? मला यातील काही ही वाटत नव्हतं. माझ्या मनातली ती जागा, जी त्याच्या साठी ठेवली होती; माझ्या आयुष्यातले ते हवेहवेसे क्षण आणि त्या आठवणी जपून ठेवल्या होत्या; ते स्वप्नांचा महाल मी मनात बांधला होता, आता एका लाटेने कोसळताना दिसत होता. हाती काही दिसत नव्हते. सगळं संपलं होतं. एक सरासरी विचार मनात आला....
"मी येऊ शकत नाही. तू दुसरी गाडी पकड आणि परत जा."
"पण का?"
"मला नाही भेटायचं. तू कोणाला विचारून आली आहेस? का आली इथे?"
हा व्यक्ती जर माझा आता इतका तिरस्कार करतोय, तर पुढे कसं होणार? जर असं नातं माझ्या वाकण्याने जपत असेल तर पूर्ण आयुष्य मलाच वाकावं लागेल. जर मी हे नातं जपण्या करिता इतका पुढाकार घेतेय हेच त्याला कळले नाही तर या नात्याचे मोल काय राहील? या नात्याचे बंध कसे टिकणार?
आता मलाच निर्णय घ्यायचा होता. स्वतःसाठी, त्याच्यासाठी आणि आमच्या दोघांच्या आयुष्यासाठी. धीर धरून मी म्हणाले,"यश... झालं बोलून.... बरं झालं. अजून काही उरलं असेल तर ते ही म्हण. आज मी तुला शेवटची संधी देतेय. जितकं काही असेल ते बोल." मी त्याच्या उत्तराची अपेक्षा करत होते पण तो काहीच बोलला नाही.

"ऐक आता. आज बोलला आहेस. या पुढे कधीही बोलू नकोस आणि कधी ही मला तुझं तोंड दाखवू नकोस. आज पासून आपलं नातं... की जे काही होतं ते संपलं. यश... तुला शेवटचा bye..."
या आधी तो काही बोलेल, मी phone ठेवला. त्या दिवशी receiver ठेवताच त्याच्याशी असणाऱ्या सगळ्या तारा तुटल्या. त्यादिवशी पुण्यातनं परत येणारी मी, आधीची मी नव्हती.
परतीच्या वाटेवर, मी रडून घेतलं. खूप रडले. त्या दिवशी माझ्या प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा घात झाला होता. काल पर्यंत सगळं किती वेगळं होतं. आज पासून आयुष्य बदललय. या पुढे सगळं काही वेगळं असणार. कुणीतरी नसणार.... याचा विचार ही मनाला बोचत होता. त्याच्यावर इतका राग होता पण त्याला विसरणं कठीण आहे हे मात्र अटल सत्य आहे....
हेच प्रेम आहे का?
---परिणीता
(२४/३/२०१२)