Tuesday, July 27, 2021

जिवलगा

माझा शाम तू, तूच माझा सखा 

तुझी राधा मी, तूच माझा जिवलगा. 

तुझ्या येण्यात असते, तुझ्याच असण्याने वसते 

तुझ्या-तुझ्या साऱ्यातून, देहाच्या कणा-कणातून 

तुझ्या तू आणि माझ्या मी पणातून  

प्रिय झाला मला, तूच माझा जिवलगा 


येई झुळूक तुझ्या गंधाची, अलगत स्पर्षति मनाशी

मग घेऊनि मला जाई आठवणींच्या जागी    

जेथे तुझ्या प्रेमाचा पडे सडा, असा माझा जिवलगा 


मनी गुंजती सूर अनेक, ओठी हसती गीत सुरेख   

लाली जडे गालांवरी, पापण्याही पडती लाजुनी  

ईश्श ! लपवावे तरी किती 

उरातील चित्र समोर उभा, तू माझा जिवलगा 


आता उगाच हसते मी, मनी तुलाच जपते मी 

दिसती भाव चेहऱ्यावरी, लाजुनी पाणी होई जरी 

घेता नाव तुझे, उचकी लागे का तुला त्या क्षणी?

तुझ्या करीता मन नादावला, तूच माझा जिवलगा 


कोणी म्हणे किती, तुझीच मी प्रेयसी 

या जागी आणि निरंतरी, आहे तुझ्या संगती 

तुझ्यात सामावलंय विश्व माझं, तूच माझा जिवलगा . 


----परिणीता (२०/१०/२०११)