Wednesday, September 9, 2020

तोच चंद्रमा नभात

"तुला वेळेवर येण्याचं महत्व कधी कळणार? किती वेळ मी एकटी बसून राहायचं? सगळे विचारत असतात. काय उत्तर द्यायचं त्यांना.... " ती फारच चिडली होती. तिची बडबड इतक्यात थांबण्या सारखी नव्हती. माफी मागितलती तर नवीन काही तरी निघेल म्हणून मी शांत बसून होतो. तिचं आपलं चालू होतं. काही क्षण मी डोळे मिटून ध्यानस्त झालो. काही काळाने बडबड बंद झाली पण धूस-फूस होती. मी गाडीचं दार उघडलं आणि बाहेर पडलो. 

छान वारा लागत होता. आज manager ने निघू नाही दिलं म्हणून उशीर झाला असं खरं सांगितलं तर जास्त चिडेल कारण काल मी manager चं कारण देऊन चहा घेत बसलो होतो. आज अडकलो ना नेमका. देव पण परीक्षा घेतो. मी गाडीला एक वळसा मारला आणि bonet पाशी येऊन उभा राहिलो. चेहरा ताठ करून गाडी मागे काही तरी बघतोय असं दर्शवत तिच्या रागाचा अंदाज घेत होतो. बडबड शांत झाली होती पण तापमान आहे कि नाही याची परीक्षा कोण घेणार?

मी तिच्या बाजूचं दार उघडलं, वाकून चेहरा तिच्या चेहर्या समोर नेला आणि प्रेमाने म्हणालो, "बाहेर ये ना..." तिनं तोंड फिरवलं. मी ताट झालो आणि मागच्या seat वर जाऊन बसलो. शांततेत माझ्या मनातलं गाणं गुणगुणु लागलो. तिला लाडी - गोडी लावत होतो पण तिच्यावर काही परिणाम होत नव्हतं, पण... 

"तुम सोचोगी क्यों इतना, मैं तुमसे प्यार करू,

तुम समझोगी दीवाना, मै भी इकरार करू.... "

ह्या ओळी म्हणताच तिनं वळून पहिलं. राग पूर्णपणे गेला हे नक्की पण आता दाखवतेय तो खोटा राग. माझे खांदे ताठ केले आणि परत तिच्या समोर जाऊन तिला विचारलं, "बाहेर ये ना.."

"नाही" राग नव्हता पण स्वर अजूनही तिखट होते. मी एका ढोपरावर बसलो आणि Romeo सारखं तिचा हात मागत म्हणालो, "ये ना .... "

"हे काय करतोयस? उठ. सगळे पाहत आहेत." ती तिथेच बसून होती. 

मी कमरेवर हात ठेवले आणि उभा राहिलो. "बाहेर येणार कि मी उचलून घेऊ?"

"नाही... "आणि ती तोंड फिरवेल इतक्यात मी तिला अलगद उचलून घेतलं. चटकन तिचा एक हात माझ्या माने भोवती होता आणि दुसऱ्या हाताने तिनं चेहरा लपवला होता.

"सोड ना... " ती लाजत म्हणाली. आता माझी पाळी होती त्रास देण्याची.

"म्म्म-हम्म"

"असं काय करतोस... सोड ना..."

"सोडू का... "आणि मी हाताला झटका दिला. तिनं घाबरून दोन्ही हात माझ्या भोवती गच्च धरले आणि माझ्या मिठीत एका teddy bear सारखी बसली. "एका अटीवर.... " मी माझा गाल पुढे केला. 

"नाही मिळणार. आज परत तू उशिरा आलास"

परत मी हाताला झटका दिला आणि तिनं माझा shirt गच्च पकडला. मी हळूच माझा गाल तिच्या ओठांवर लावला आणि तिला खाली उभ केलं. तिनं लगेच मला मिठी मारावी हे अपेक्षित नव्हतं. मी हि तिला मिठी मारली. तिचं डोकं मध्य छातीवर येईल इतकीच उंच होती ती. 

"I  love  you, पिल्लू", मी तिच्या केसांना kiss केलं. 

"I  love you too... "

एक kiss झाली कि राग विसरायचं हि आमची अट होती. आता राग संपला होता. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिनं माझ्या कमरेवर. अंधार होऊ लागला होता. थोड्याच वेळात तिचा जाण्याचा हट्ट सुरु होईल आणि माझे तिला अडवण्याचे प्रयत्न. आभाळात लुकलुकणारे चांदणे दिसू लागले. त्या टेकडीवरून पळत असलेल्या गाड्या आणि जगमगतं शहर दिसत होतं.

"उशीर होतोय. निघायचं का?" ति वळत होती, "अरे! आज चंद्र पाहिलं का? सुंदर दिसतोय. बघ ना"

"हो... खूप सुंदर आहे... पण इकडे." मी तिचा चेहरा माझ्या हातात घेतला. "माझा चंद्र त्याहून सुंदर आहे."

ती लाजली, "तुझं आपलं काहीतरीच असतं. चल आता."

"will you dance with me?" आणि मग ते 'no music' चा इशारा तिनं केला. "ऐक... नीट ऐक... " मी तिचा हात हातात घेतला आणि waltz style मध्ये डोलू लागलो. त्या शांततेत आम्ही एका-मेकात गुंतलो होतो. चांदण्यात तीच दिसत होती आणि मनात एक गाणं सुचलं. 

"तुझ्यासाठी एक गाणं म्हणू?"

"कोणतं?"

मी सुरु झालो, "तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी, एकांती माज समीप तीच तू हि कामिनी. तीच तू हि कामिनी.."

"म्हणजे?"

"म्हणजे, चंद्राच्या चांदणी सारखी तूच माझी कामिनी आहेस... " आम्ही काही वेळ तसेच हातात हात घेऊन झुलत होतो. उशीर होत होता पण जाण्याचा हट्ट सुटला होता. माझ्या चंद्राला मिठीत धरून मी त्या आभाळातल्या चंद्राला चिडवत होतो जणू. कदाचित म्हणून त्याचं चांदणं अजून खुललं होतं आणि त्या चांदण्या आम्हावर लुकलुकत हसत होत्या.

----परिणीता (०८/०९/२०२०)

Monday, June 15, 2020

शब्दावाचून कळले सारे

पाहिलं प्रेम हे फुलपाखरा सारखं असतं. ते स्वइचछेने आपल्या जवळ येतं आणि आपण जवळ गेलो कि भुर्र्कन उडून जातं. त्यातील मज्जाच निराळी असते. काही वेळ भोवती उडून आयुष्यभरासाठी त्याची आठवण देऊन जातं.

हि गोष्ट आहे मकु आणि मयुची, माझ्या पहिल्या प्रेमाची. या गोष्टीतला मी, मकु आणि ती, मयु. सुरुवात एका चित्रपटा सारखीच झाली होती. एकदा तिची मैत्रिणीचं माझ्या मित्राशी बोलणं झालं. त्या नंतर हि बातमी माझ्या मित्रांना कळली, मग माझ्या पर्यंत पोचली. अमुक-अमुक मुलगी मला पसंत करते. मी तेव्हा ११वीत होतो. आपल्याला कोणी तरी line देतंय म्हणून गंमत वाटली. पण मित्रांमध्ये फजिती झाली म्हणून राग पण आला. त्याच दिवशी तिला जाऊन सुनावलं आणि आमचा वाद तिथून सुरु झाला. एक-मेका समोर आलो कि खुन्नस दाखवणं रोजचं झालं होतं. पण हे दिवस जास्त काळ टिकले नाही. 

माझ्या वडिलांची फिरतीची नोकरी होती. १२वीत मी शहरात आलो. ११विचं पूर्ण वर्ष आम्ही राग दाखवण्यात घालवला होता. जाता-जाता, सर्व मिटवून जावं. मी तिला sorry म्हणायला गेलो आणि तिची friendship घेऊन आलो. असं का करावं कुणाच ठाऊक पण काही अर्ध सोडून येणं मला पटत नव्हतं. मयुचं पर्व इथेच संपवलं असं समझून मी त्या दिवशी निघालो. वेळ गेली तसं समझलं मयुचं पर्व तर आता सुरु झालंय. 

आम्ही रोज सारखे एक-मेकांना पाहू शकत नव्हतो. दूर राहत होतो पण अंतर कमी होत होतं. अधी एक-मेकांचं तोंड पाहत नव्हतो पण आता एका call च्या हाकेवर आम्ही बोलू लागलो होतो. माझ्या वाढदिवसाला तिनं पहिल्यांदा माला call केला होता. त्या काळी, mobileची सुविधा नव्हती. घरातल्या landline वर ती coinbox वरून call करायची. २ ते ३ नाण्यांचं budget असायचं. त्यात जमेल तितकं बोलायचो आणि उरलेलं पुढच्या वेळीसाठी राखीव असायचं.

महिन्यात एकदा गावी फेरी असायची. तेव्हाच आमची भेट होयची. गावा बाहेर एक नदी होती. तिच्या काठाशी आम्ही बसायचो आणि मनसोक्त बोलायचो. घरी आल्यावर पुन्हा भेटण्याची ओढ असायची. असं कधी कोण बद्धल वाटलं नव्हतं. दर महिन्याची गावची फेरी हवी-हवीशी वाटू लागली होती. एकदा कामा निमित्त आमचं गावी जाणं cancel झालं. मी जाण्याचं खूप हट्ट केला, पण काही उपयोग झाला नाही. काही करून तिला भेटायचं होतं. महिना भर वाट पाहिल्यावर तिला पाहणार होतो. काही करून माझं गावी जाणं निश्चित होतं. 

त्या काळी दिवसाला १ train गावी जायची. तिकिटाचे पैसे जमा करून station ला पोहोचे पर्यंत माझी ती train चुकली. जाणं तर ठरलं होतं. मागून एक माल-गाडी येत होती. मला त्या गाडीत चढायचं होतं. मी तिच्या गतीचा अंदाज घेतला. त्याचे डब्बे एक-एक करत पुढे सरकत होते आणि डब्ब्यांचं वेग कमी होत होता. मी कसलाच विचार न करता, guard च्या डब्ब्यात उडी मारली. माझा आनंद आभाळी पोचलं होता आणि तसंच जमिनीवर आला. दुष्काळात १३ वा महिना म्हणावं, गावाचं स्टेशन मागे राहिलं आणि गाडी yard त जाऊन थांबली. पण तिला भेटण्या करीत मी २ किलोमीटर चालून platform पर्यंत आलो. 

खूप थकलो होतो. पाय दुखत होते. तिला समोर पाहिलं आणि अचानक छान वाटू लागलं. थकवा जाणवत नव्हता. तिच्यासोबत १ तास घालवायला सर्व अट्टाहास.  ती, मी आणि नदीचं काठ... राधा-कृष्णा सारखी feeling येत होती. असं पहिल्यांदा जाणवलं होतं. काही काळ हे असंच घडत होतं. आम्ही गुपचूप भेटायचो.  वेगळीच भावना होती. वेगळंच जग होतं आमचं. 

एक दिवशी ती भेटायला आली आणि तिच्या साठी आलेल्या स्थळा बद्धल सांगितलं. तिच्या घरी सर्वांना मुलगा आवडला होता. मी काहीच बोललो नाही. त्या दिवशी ती भेटण्याची गंमत हरवली होती. मला काय म्हणायचं ते उमजत नव्हतं. अंधार होऊ लागला होता. मी घरी परतलो. काहि दिवस गेले तिचा call आला नाही. मग महिना गेला पण call आला नाही. गावी गेलो आणि मी नदी काठी तिची वाट पाहत होतो. पण ती आली नाही. असं काही महिने गेले. सुरवातीला मला काही सुचत नव्हतं पण समझलं आता ती येणार नाही. 

बरेच महिने गावी गेलो नव्हतो. परीक्षे नंतर गावी जावं असं वाटलं. मयुचा जुना मित्र म्हणून तिच्या घरी गेलो. तिच्या आईशी बोलणं झालं. गेल्या महिन्यात तिचं लग्न झाल्याचं कळलं. त्यावर मी हसून पेढा तोंडात कोंबला. मला तिथून निघायचं होतं. थोड्या वेळाने मी बाहेर पडलो. मला रडू येत होतं पण मी रडलो नाही. मी घरी आलो. शांत पडून राहिलो. येत्या दिवसांमध्ये तिचा विसर पाडत होतो. पण कधी phone दिसला कि तिचा विचार यायचा. गावी गेलो कि ती आठवायची.

बरेच प्रयत्न केले पण एकदा तिला पाहायची ओढ होती. त्या दिवशी तिला काही बोललो नाही त्याची भरपाई कदाचित. पण शेवटचं तिला पाहायचं होतं. दुसऱ्या दिवशी मी तिच्या गावी निघालो. गावात विचारत-विचारत तिच्या घरासमोर पोचलो. दारा पलीकडे ती असेल याचा विचार करून मी तिथेच उभा राहिलो. दार वाजवलं  नाही. माझी हिम्मत झाली नाही आणि मी वळलो. इतक्यात दार उघडलं आणि समोर ती उभी होती. पण ती माझी 'मयु' नव्हती. कपाळी कुंकू, हाती हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र. ती कोणाची तरी 'माया' होती. काही वेळ मी तिला पाहत तिथेच उभा राहिलो. भिजलेल्या पापण्यांतून आम्ही एक-मेकांना पाहत होतो. काही न बोलता मी तिथून निघालो. 

ती आमची शेवटची भेट. म्हणतात पाहिलं प्रेम अपुरं राहतं. मकु आणि मयुचं पर्व या टप्प्यावर संपलं होतं. आमचं प्रेम कधी शब्दात व्यक्त केलं नव्हतं. ते फक्त अनुभवलं होतं. असा अनुभाव जो आयुष्यभर पुन्हा जाणवणार नाही. पाहिलं प्रेम परत होत नाही तसेच माकुची मयु पुन्हा दिसणार नाही.

---परिणिता (१४/०६/२०२०)


नवा प्रवास

हिरव्या शालूची बांधली गाठ
हिरव्या चुड्याने भरला हात
नवी स्वप्ने, नव्या आयुष्यात
उभारते नवे जीवन नव्या घरात

जोडली नाती नव्या माणसांशी
जुनी नाती हि घेऊनि संगती
पाऊल टाकते आपल्या घरी
आरंभ करते नव्या ओळखीची

सोडूनि आले बालपण आता 
सुनपणाचा घेते वसा 
घेऊनि हाती हा संसार
चालू दोघे नव्या वाटा 

थोडं तू आणि थोडं मी
आपले आपण झालो कधी
'आहो! ऐकता का?' म्हणत
कळेना काळ गेला कधी

त्यातील ते रुसवणारे रुसवे 
तर कधी असतील फुगवे 
गंमत असे हि जगण्याची 
आठवण ठसवे आपल्या नात्याची

गोड आंबट क्षणात रंगले
आयुष्य तुझ्या माझ्या सावे
फुलापरी जपत आहे
घरटे आपल्या फुलांचे.

सौभाग्य माझे तुझ्याशी बांधले 
मांडुनी आयुष्य तुझ्या भोवती 
प्राण माझा तूच आहेस
संसार माझा तुज्याच सोबती. 

----परिणीता (०३/०६/२०२०)

Thursday, May 21, 2020

संयोग

योग आणि योगायोग वर, माझा विश्वास होता. पण संयोगावर मुळीच नव्हता. ज्या क्षणी आपण एखाद्या गोष्टीवर अविश्वास दाखवतो तेव्हा नियती असे काही योग जुळून आणते कि मग त्यावर विश्वास न ठेवण्याचं प्रश्नच उरत नाही. एके दिवशी मित्रांशी वाद घातला होता, संयोग असतो कि नसतो. मी Einstein आणि quantum physics च्या बाता मारून सर्वांना गप्प केलं होतं. पण त्या दिवसा पासून माझ्यासाठी "संयोग" जुळवून आणायचं याचे कट नियती रचू लागली होती. 

सुरुवात झाली होती दुसऱ्याच दिवशी.. 

माझे training चे दिवस होते. माझ्या साहेबाने मला आयकर भवन ला पाठवलं होतं. सवाई नुसार मी वेळे आधीच पोचलो आणि वॉर्ड क्रमांक शोधून बाहेर बसून राहिलो. त्या काळी सवाई नुसार कामे निवांत सुरु व्हायची. वाचण्याकरिता एक वही घेऊन बसलो. पण वाचण्या ऐवजी त्यात काहि तरी कोरू लागलो. काही वेळात चार ओळींची, यमक जुळवणारी चारोळी लिहिली. सवतःला शाहबाशी देत ती वाचून काढली. हे हि जमतं आपल्याला!! वाह राव! असं स्वतःला म्हणतच होतो इतक्यात मला आत पाठवलं. माझ्या पुढे २ इसम उभे होते. आपण यांच्याहून कसे छान आणि रुबाबदार दिसतो हे पाहत आणि दाखवत मी आपली नजर त्या hall मध्ये फिरवली आणि एका नाझरेवर ती थांबली. हि मुलगी... मला पाहत होती का? मी पुन्हा तिच्याकडे पहिलं  पण मध्ये कोण तरी अडवा आला. तो बाजूला होईल तोवर माझा नंबर आला. काम होताच लगबगीने मी माझी bag उचलली आणि तिला शोधत निघालो. या सर्व गडबडीत, ती वही तिथंच सुटली आणि माझी पहिली चारोळी  हरवली. चारोळी लिहिली हे योग, ती हरवली हे योगायोग आणि इतकं होऊन जर ती सापडली तर योग कि संयोग?

Office  नंतर संध्याकाळचे classes असायचे. दिवसभराच्या दगदगी नंतर local ची गर्दी आणि मग classes चा AC. आहाहा! काय बरं वाटायचं. पण एकदा मला उशीर झाला. शेवटच्या क्षणी आलेला client आणि मग local साठी थांबून अजून उशीर झाला. पोचता-पोचता एक तास उशीर झाला होता. आत जाऊ कि वाडा पाव खाऊन बाहेरच बसू. अभ्यास बुडेल म्हणून हो-नाही करत आत गेलो. सर्वात पुढच्या बाकवर जागा रिकामी होती. का आलो मी इतक्या उशिरा? काही समझत नव्हतं. इकडून तिकडून notes गोळा करत होतो. शेवटी ५ मिनिटासाठी Sir बाहेर गेले तेव्हा निवांत वाटलं. मागे वळून मित्रांना हात दाखवत होतो. पण माझ्या मागेच ती बसली होती. हीच ती !! माझ्याच वर्गातली ! तरीच ती ओळखीची वाटत होती. मी मित्रांना हात दाखवत होतो पण तिला पाहत होतो. Class संपला आणि तो दिवस हि.

शनिवार आणि रविवार ची classes मध्ये गम्मत असायची. ६ तासांचा class आणि त्यात ३० मिनिटांची मधली सुट्टी. त्या सुट्टीत कधी-कधी ती पण दिसायची. मी तिला पाहत असतो हे माझ्या मित्रांपासून लपलं नव्हतं. माझ्या मनात तर असं काही नव्हतं. Career comes first या तत्व वर मी जगत होतो. मित्रांनी एकदा गम्मत केली. आधी एक जण गेला आणि तिला "hello" म्हणून आला. दुसरा गेला आणि नाव विचारून आला. तिसरा गेला college विचारून आला. पण या वेळी तिसऱ्याच्या मागोमाग ती पण आली. येऊन आमच्या समोर उभी राहिली. तिघांकडे पाहीलं आणि मग माझ्याकडे. माझ्या घश्याला कोरड पडली होती आणि गाल शिवशिवू लागला होता. आता तर पडलीच मला.  मनातल्या मनात देवाचं नाव घेत होतो आणि 80s-90s चे heroine ने कानाखाली मारलेली scenes आठवले. 
"तुला पण काही विचारायचं असेल ना... ? हम्म ?" तिचे मोठे डोळे अजून मोठे करून पाहत होती. थोडे honey-brown रंगाचे डोळे होते. सुंदर आणि टपोरे. मी फक्त मान हलवून नाही म्हणालो आणि ती लगेच निघून गेली. त्यानंतर मी पुन्हा तिच्या वाटेला चुकून हि गेलो नाही. 

वर्ष संपलं. Classes संपले. परीक्षा ३ महिन्यावर होती. मी अभ्यासात पूर्णपणे बुडालो होतो. दुसरं काही सुचत नव्हतं. त्यात माझ्या मित्राचा call आला आणि उद्या important lecture साठी book केलंय सांगत होता. मला तो काय बडबडत होता काही कळलं नाही. पण दुसऱ्या दिवशी सांगितल्या वेळी मी पोचलो. एका दिवसात अखंड विषय खूप जड झालं मला. पण दुपारी दाबून जेवलो. बरेच दिवसांनी इतकं खाल्लं होतं. lecture ला परत जात असताना पाणी प्यायला गेलो. Glass वर करून घोटभर पाणी थोंडात घेतलं आणि ती समोर उभी होती. तिला अचानक पाहताच माझ्या नका-तोंडातून पाणी निघालं. जोरात ठसका लागला. Shirt ओला झाला. नेहमी हिच्या समोर माझी फजिती कशी होते? देवा कधी तरी माझी image वाचव!

"अररेरे!! आरामात पी." आणि पहिल्यांदा मला पाहून तिने smile दिली. मी आपला लाजून कसा-बसा तिथून सटकलो.

मग काही नाही. परीक्षा झाली. निकाल लागले आणि मी पुण्यात नोकरी घेतली. माझं मुंबई-पुणे-मुंबई सुरु झालं होतं. त्या दिवशी सवाई नुसार मी वेळे आधीच स्वारगेटला पोचलो. Bus यायला वेळ आहे म्हणून तळ्यातल्या गणपतीला गेलो. त्याला हात जोडले आणि वळलो तर नेहमीसारखी ती माझ्या मागेच उभी होती. माझे श्वास थांबले. पण या वेळी मी हिम्मत केली आणि तिला "hi" म्हणालो. ती पण माझ्या सोबत हसून बोलू लागली. इतक्या दिवसांनी पण ओळख दाखवली!! बोलत बोलत आमच्या ३ भेटींना तिच्या बाजूची गोष्टी पण जुळून येत होती. 

ती मूळ पुण्यातली. शिक्षणाकरिता मुंबईला आली होती. त्या दिवशी तिचा अभ्यास बुडाला म्हणून आमच्या वर्गात बसली होती. ती आमच्या वर्गात नव्हती पण शनिवार आणि रविवार, दोन्ही वर्ग एकत्र यायचे. म्हणून ती मधल्या सुट्टीत दिसायची. त्या special lecture साठी तिने ६ महिने आधीच booking केली होती आणि ती एका दिवसाकरिता मुंबईला आली होती. त्या lecture ला मला माझ्या मित्राने आग्रहाने बोलावलं होतं. ती हे सर्व सांगत असताना आम्ही bus जवळ पोचलो. यावेळी मला तिचं नाव आणि नंबर विचारायचं होतं. निघतावेळी मी माझा visiting card तिच्या हातात दिला आणि "stay in touch" इतकाच म्हणू शकलो. Bus सुटतच होती इतक्यात मी दारात आलो आणि मी म्हणेन तर तीच म्हणाली... 
"संयोगिता." मी पाहतच राहिलो आणि तिने जाता जाता पुन्हा smile केली.
त्या प्रवासात माझ्या डोक्यात विचार चालू होते. माझ्या प्रत्येक गोष्टीला तिची गोष्ट जुळून येत होती. हे निव्वळ योगायोग नसून प्रत्येक वेळी घडलेले संयोग होते. माझी पहिली चारोळी मला परत सुचली. ती जणू याच क्षणाला जोडत होती.... त्या दिवसा पासून. 

तुझ्या नझरेत पहिले मी जग
तुझ्यासाठीच झुरलो दररोज
घडतील आपल्या करीत सर्व योग
तू माझी संयोगिता, आणि मी तुझाच संयोग.

----परिणीता (२०/०५/२०२०) 

Tuesday, May 19, 2020

नसतोस घरी तू जेव्हा

"miss you too..." 

असं म्हणत मी phone बाजूला ठेवला. miss you म्हणजे काय ते त्याला समझले असेल का कधी? दोन शब्द आणि बरंच काही म्हणून जातात. दिवसाच्या प्रयेक क्षणात असणारा आभास. पण बोलताना फक्त.... miss you... 

सकाळी डोळे उघडण्या आधी माझं alarm snooze करत राहणं. तू मला हलवून उठवणं आणि alarm  ला आराम द्यायला सांगणं. तरीही ५ मिनिट अजून असं म्हणत रोज उशिरा उठणं. त्यात "उशीर झाला" असं ओरडत पळापळ करणं. मग सर्व आवरून, office ला जाताना तुला उठवायचं आणि दिवसभराच्या सूचना देत तुला घाई-घाईत drop करायला सांगणं. आज पहिल्या alarm ला उठून शेजारची उशी रिकामी पहिली. त्यावर हात फिरवत तू असण्याचा आभास जाणवतो... तेव्हा I Miss You!

Office च्या धावपळीत lunch-break मध्ये तुला आठवणीने phone करणं. दुपार पर्यंत काय-काय घडलं आणि संध्याकाळी काय करायचं याचं plan आखणे. स्वयंपाक ठीक आहे कि नाही याची खात्री करणं. एखाद्या दिवशी call जमलं नाही तर message टाकून कळवणं. पण निवांत अन्न ग्रहण करताना तुझं स्मरण करणं. आज तो mobile जेवत असताना सोबत नसतो. त्यावर तुझं नाव झळकत नाही. जेवणाची आणि दिवसाची वार्ता होत नाही... तेव्हा I Miss You!

संध्याकाळी वेळेत काम आवरणं. पळत-पळत रोजचं market फिरून घर गाठायचं. उद्या काय स्वयंपाक करायचं याचा विचार करत तुला एक update call करणं. कधी तरी surprise भेट म्हणून तुझं किंवा माझं भेटीस येणं. आज office नंतर घरी जाण्याची घाई नसते. घरी आपली कोणी वाट पाहत नाही आहे हे विचार मनाला भेदतं...  तेव्हा I Miss You!

Kitchen मध्ये अनेक प्रकारचे पकवान बनवून तुला खाऊ घालणं. बेचव असतानाही "वाह - वाह" म्हणत खाणं . आवडलेले पदार्थ बनवण्यास जेव्हा तू २-३ वेळा हट्ट करायचा तेव्हा मनातल्या-मनात आनंद वाटायचं. रोज काही नवीन बनवायची स्फूर्ती घेऊन रोजचा नवीन recipe शोधणं. कधी hit तर कधी flop. आपण काही नवीन घडवतो, याचा आनंद वाटायचं मला. आज त्या kitchen  मध्ये counter समोर उभं राहून काहीच सुचत नाही. स्वतःसाठी instant noodles बनवताना पाण्यानी पोट भलंय असा समझतं. रिकाम्या kitchen मध्ये डोळ्यात पाणी तरळतं... तेव्हा I Miss You!

घरातील प्रत्ये वस्तू सजवताना त्याच्याशी जोडलेली गोष्ट आठवते. एक-एक दिवस त्या वस्तूत दिसू लागतं. त्या कुंडयांतील झाडांना पाहत, आपल्या घरी एक नवीन व्यक्ती आलाय असं आनंद असायचं. 'मोगरा कधी फुलणार? गुलाबाला काय झालाय बघना. शेवंती बघ कशी फ़ुललेय!' असं म्हणत तुझ्या त्यांची देखरेखचा वसा घेणं. आज सर्व झाडे फुललेली पाहून माझं हसू मात्र कोमेझतं... तेव्हा I Miss You!

कपाटातील तुझं गंध. माझ्या brush च्या शेजारी तुझा brush असणं. माझं साबण जास्त सुगंधित आहे म्हणून गुपचूप तू पण तेच वापरणं. कधी-कधी मला शंखा आली कि 'थोडंसं वापरलं होतं' असं म्हणत पळ काढणं. आज ते साबण खूप काळ संपत नाही... तेव्हा I Miss You!

रात्री bed वर पडताना अनेक आठवणी डोक्यात दाटतात. तेच-तेच विचार फिरू लागलात. Doctor म्हणतात सतत एकच विचार केल्या मुळे depression आहे. Doctor ला कोण समझवेल, तू दूर गेलास तरीही दुरावला नाहीस, पण तुझं दरवळ सतत असतं. दिवस भराचे डोळे मिटताना देवकडे आयुष्यभराचे डोळे मिटावे हे  मागताना, I Miss You!


------परिणीता (१९/०५/२०२०)

Friday, April 3, 2020

हाती तुझ्या हात आहे

" तुझी साथ लाभली  माझ्या जीवनी. पावले चालली तुझ्या सावे, साजणा.
 स्वप्न हे माझे कि तुझे उमजेना, हात तुझ्या हाती दिले रे मोहना. "


नजरेस तुझी ओढ आहे,
तूच समोर असो वाटे
क्षणभर जरी झालास दूर 
मन होई तुझ्यासाठी आतुर
नजरेत माझ्या तूच आहे 
हाती तुझ्या हात आहे ... 

असा का रुसवा आहे माझा 
मागे तुझ्यापाशीच तुला आता 
जावळी येऊनि मिठीत घेता 
हळूच गालात हसू येता 
माझा रुसुवा हि दूर व्हावे 
हाती तुझाच हात आहे... 

लोचनी माझ्या तुझीच स्वप्ने 
हृदयी तुझीच प्रीत वसे 
तुझ्यात पूर्ण हरवुनी जावे
तरीही माझ्यात तुला शोधावे 
तुझ्यात मी सामावले आहे 
हाती तुझ्या हात आहे 

--परिणीता (२९/०३/२०२०)