सणांचे दिवस म्हणजे घराची वाट धरायची. मुंबईतनं गावी जायचं म्हटलं
की तब्बल 4 तासांचा प्रवास. सणांमुळे गर्दी फारच होती. एक तास वाट पाहून
जागा मिळेल अशी बस, stop वर आली. इतक्या उकडत्या दिवसानंतर, बसची गर्दी
पहायची होती. पण भाग्यवान मी, लगेच मला एक सीट रिकामी दिसली आणि एखादा गड
जिंकावा असा उत्साह मनात भरला. सगळं सामान जाग्यावर लावून A .C .चा डक्ट
adjust केला. खूप वेळा नंतर दीर्घ श्वास घ्यायची संधी मिळाली होती. डोळे
मिटून, पुढच्या प्रवासात झोपायचं ठरवलं. volvo बसचं वैशिष्ट्य म्हणजे A .C .
आणि traffic मध्ये ही शांतता. आराम दायक प्रवास. दचके किंवा हादरे नाहीत.
10-15 मिनीटांच्या शांतते नंतर, कुणाच्या तरी खिदळण्याचा आवाज माझ्या
कानी आला. मी दुर्लक्ष केलं , परत तेच. माझ्या शेजारी बसलेली मुलगी cell
च्या screen वर काही-तरी पाहून हसत होती. आता A .C . बसचे तोटे मोजा.... बस
मध्ये बाहेरचा आवाज तर येत नाही पण या शांततेत लहान आवाज ही स्पष्ट ऐकू
येतो. मी परत डोळे मिटले. पण तिचं हसणं माझी झोप पळवण्यात यशस्वी ठरलं. आता
एका मुलीला काही बोलणं किती रुक्ष वाटेल, म्हणून मी कानांना headphones
लावले. गाणी ऐकत असताना माझं लक्ष तिच्या screen कडे गेलं. एक romantic
चित्रपट चालू होता आणि त्यातील scenes पाहून तिला फार मज्जा वाटत होती.
प्रयत्न फार केले पण तिचा चेहरा काही दिसला नाही. तरीही अधून-मधून तिचं हसू
ऐकू येत होतं.
माझ्याकडे न पाहता तिनं तिचा हात मधल्या handle वर ठेवला. चुकून तिच्या हाताचा धक्का माझ्या हाताला लागला. दचकून ती पालटली.इतक्या वेळा नंतर का होईना, चेहरा दिसला. वाटलेला
माझ्याकडे न पाहता तिनं तिचा हात मधल्या handle वर ठेवला. चुकून तिच्या हाताचा धक्का माझ्या हाताला लागला. दचकून ती पालटली.इतक्या वेळा नंतर का होईना, चेहरा दिसला. वाटलेला
तशी काही नटी सारखी नव्हती. अगधी साधारण रूप व नाक-नक्षा. तिनं आपला हात सरकवला. माझा हात मी न हलवता तिथच ठेवला. Why should I?
माझी
अशी प्रतिक्रिया पाहून ती नक्की चीढली असावी. पण माझ्या कडे न पाहता किंवा
मला काहीच न बोलता, तिनं स्वतःला सीटवर adjust केलं. तिनं तीझी bag आमच्या
मध्ये ठेवली आणि परत चित्रपट पाहण्यात मग्न झाली. मी मनातल्या मनात
म्हणालो.... बरं झालं! आणि मी परत डोळे मिटले. पण झोप काही लागत नव्हती.
गाडीच्या बाहेर हिरवळ पहावी म्हणून खिडकीच्या बाहेर नजर फिरवली आणि अचानक
असं जाणवलं कि आपल्या शेजारीच हिरवळ आहे. ते साधारण रूप आता काही साधारण
वाटत नव्हतं. नकळत मी तिला पाहत राहिलो. कधी या हाताने तर कधी त्या हाताने
हनुवटीला आधार देत होती. तर कधी केस खोलुन केस बांधणे. कधी केसां सोबत
खेळणं. सतत काही तरी चूळ-बुळ चालू होती. मग मधेच हासणं. आई शपथ!! कसली गोड
दिसत होती ती! मी तिची अदा पाहताच राहिलो. आपल्याला कुणी तरी पाहतय असं
वाटताच ती माझ्या कडे पाहू लागली आणि मी लगेच खिडकी बाहेर पाहू लागलो. गाणी
ऐकतोय असं दर्शावलं. पण सत्य काय ते तिला हि माहित होतं. ती परत चित्रपटात
गुंग झाली आणि मी... मी तिला पाहण्यात.
तिच्या
हुशारीच काय सांगू? ती माझ्या कडे पाठ करून असं angle लावून बसली होती कि
ती cell च्या screen मध्ये माझा प्रतिबिंब पाहू शकत होती. मी पण दीड
शहाणा. मी चष्मा लावला. आता कसा कळणार?
थोड्या
वेळात snacks break झाला. मी एक वाडा-पाव घेऊन बस जवळ तिची वाट पाहत उभा
राहिलो. काय आज-कालच्या मुली! figure जपण्य करिता तिनं फक्त एक diet cokeचा
कॅन आणला होता. चार तास त्या 300ml पाण्यावर कशी राहणार ही! कमाल आहे.
आता
सीटवरची position बदलली होती. मधली bag गायब झालेली. कॅन संपेपर्यंत
चित्रपट बंद होतं. आरामात बसून, खिडकी बाहेर पाहत, ती drink enjoy करत
होती. handle वर माझा हात होता पण आता ती स्वतःसाठी जागा घेत होती. या वेळी
मी माझ्या हाताला सरकवला. ठेव बाई. तिनं नजरही फिरकवली नाही आणि मी तिला
एक टक पाहत होतो. संपलेला कॅन सीट खाली ठेवून ती परत चित्रपट पाहू लागली.
अचानक ती खुर्चीत खाली सरकून, आक्रसून बसली. मला काही काळेनासं झालं.
थोड्या वेळाने ती सीटच्या वरच्या भागात पाहू लागली. मागच्या माणसाने त्याचा
हात सीटवर ठेवला जे तिला आवडत नव्हतं. मी वळून पाहिलं. एक लोचट व्यक्ती
सीटच्या मधून तिला पाहायचं प्रयत्न करीत होता. कुणाच ठाऊक का... पण माझं
रक्त सळसळू लागलं. हा माणूस अर्धा-म्हातारा आणि आपल्या नातीच्या वयाच्या
मुलीला पाहतोय. बस मध्ये scene तर करायचा नव्हता पण मला तिचा त्रास ही
पाहवत नव्हता. काही न बोलता, मी त्याचा हात उचलून माझ्या सीटवर ठेवला. हे
पाहून त्यानं स्वतःचा हात काढला आणि स्वतःची चूक समझताच सभ्य माणसा सारखा
बसला. मला काही राहवत नव्हतं. रागाने माझे डोळे लाल झाले होते पण या वृद्ध
व्यक्तीवर काय राग काढणार, म्हणून मी गप्पा बसलो. इतकं सगळं घडत होतं आणि
ती एका निरागस मुला परी चित्रपट पाहत होती. तिला पाहत माझा राग ही नाहीसा
झाला. तिला हसताना पाहून मी ही हसू लागलो. तेव्हड्यात तिनं माझ्याकडे
पहिलं. मी परत खिडकी बाहेर पाहू लागलो. सीटवरचा हात गायब झाल्याचं पाहून ती
परत नीट बसली.
प्रवासाचा
शेवटचा दीड तास उरला असेल जेव्हा तिचा चित्रपट संपला. ती घरी call करून
तिच्या येण्याची वेळ कळवत होती. तिचं बोलणं ऐकत कळलं ती माझ्याच गावी
उतरणार आहे. त्या उरलेल्या प्रवासात मन भरून तिला पाहून आणि ऐकून घेतलं.
तिच्या बद्दल अजून काही कळलं नाही. कमीतकमी नाव तरी कळलं असतं. प्रवास
संपत आला होता आणि माझ्या मनात महम्मद रफी गाऊ लागले,
"..... और थोड़ी देर में बस, हम जुदा हो जायेंगे,
आपको धुंडुंगा कैसे, रास्ते खोजायेंगे,
नाम तक भी तो नहीं, आपना बताया आपने...."
खरच
या चार तासाच्या प्रवासात असं काही घडेल याची कल्पना ही केली नव्हती.
माझ्या "दिल" चं "दर्द-ई-दिल" झालं होतं. हो-हो म्हणत गाडी डेपोला लागली.
मी तिच्या नंतर उतरलो. खाली उतरताच तिला शोधलं तर ती कुठंच दिसत नव्हती.
वाऱ्यासारखी आली आणि निघून गेली आणि माझ्या मनाला
पूर्णपणे हलवून गेली. चार तासाची ती साथ, पुन्हा भेटण्याची ओढ लाऊन
गेली.
--परिणीता
(15/8/2012)
(15/8/2012)