मन... हे असंच असतं,
कधी नितळ पाण्या सारखं
तर केव्हा खळ-खळ वाहणारं
कधी अगधी सावरलेलं
तर केव्हा स्वतःत गुंतलेलं
कधी जगात काही शोधणारं
तर कधी आपल्यात जग समवणारं
मन... हे असंच असतं,
कधी कुणास लळा लावणारं
तर कधी कुणाचं वेढ लावून घेणारं
कधी स्वतः करिता सर्व हिसकावणारं
तर कधी सगळं अर्पण करणारं
कधी आसरा देणारं
तर कधी निराश होणारं
मन... हे असंच असतं,
कधी मन-मोकळं हसणारं
तर कधी आतल्या आत घुसमटणारं
कधी वार्या परी चहु दिशेला उडणारं
तर कधी स्वतःत रमणारं
कधी सहज हळवं होणारं
तर कधी धीराचं बांध बांधणारं
मन... हे असंच असतं,
कधी क्रोध न दर्शवणारं
तर कधी अमाप प्रेम लपवणारं
कधी हजार गोष्टी सांगूनही अबोल राहणारं
तर कधी काही न बोलता सगळं सांगणारं
कधी कुणा मागे धावणारं
तर कधी वळून न पाहणारं
मन... हे असंच असतं,
कधी खुळं, तर कधी खूळ लावणारं
कधी वेडं, तर कधी वेढ लावणारं
कधी खुल्यावणी प्रेमात पडणारं,
तर कधी वेड्यागत प्रेम करणारं
---- परिणीता (३/२/२०१३)
कधी नितळ पाण्या सारखं
तर केव्हा खळ-खळ वाहणारं
कधी अगधी सावरलेलं
तर केव्हा स्वतःत गुंतलेलं
कधी जगात काही शोधणारं
तर कधी आपल्यात जग समवणारं
मन... हे असंच असतं,
कधी कुणास लळा लावणारं
तर कधी कुणाचं वेढ लावून घेणारं
कधी स्वतः करिता सर्व हिसकावणारं
तर कधी सगळं अर्पण करणारं
कधी आसरा देणारं
तर कधी निराश होणारं
मन... हे असंच असतं,
कधी मन-मोकळं हसणारं
तर कधी आतल्या आत घुसमटणारं
कधी वार्या परी चहु दिशेला उडणारं
तर कधी स्वतःत रमणारं
कधी सहज हळवं होणारं
तर कधी धीराचं बांध बांधणारं
मन... हे असंच असतं,
कधी क्रोध न दर्शवणारं
तर कधी अमाप प्रेम लपवणारं
कधी हजार गोष्टी सांगूनही अबोल राहणारं
तर कधी काही न बोलता सगळं सांगणारं
कधी कुणा मागे धावणारं
तर कधी वळून न पाहणारं
मन... हे असंच असतं,
कधी खुळं, तर कधी खूळ लावणारं
कधी वेडं, तर कधी वेढ लावणारं
कधी खुल्यावणी प्रेमात पडणारं,
तर कधी वेड्यागत प्रेम करणारं
---- परिणीता (३/२/२०१३)