Sunday, August 19, 2012

का कळेना कोणत्या क्षणी

सणांचे दिवस म्हणजे घराची वाट धरायची. मुंबईतनं गावी जायचं म्हटलं की तब्बल 4 तासांचा प्रवास. सणांमुळे गर्दी फारच होती. एक तास वाट पाहून जागा मिळेल अशी बस, stop वर आली. इतक्या उकडत्या दिवसानंतर, बसची गर्दी पहायची होती. पण भाग्यवान मी, लगेच मला एक सीट रिकामी दिसली आणि एखादा गड जिंकावा असा उत्साह मनात भरला. सगळं सामान जाग्यावर लावून A .C .चा डक्ट adjust केला. खूप वेळा नंतर दीर्घ श्वास घ्यायची संधी मिळाली होती. डोळे मिटून, पुढच्या प्रवासात झोपायचं ठरवलं. volvo बसचं वैशिष्ट्य म्हणजे A .C . आणि traffic  मध्ये ही शांतता. आराम दायक प्रवास. दचके किंवा हादरे नाहीत.
10-15 मिनीटांच्या शांतते नंतर, कुणाच्या तरी खिदळण्याचा आवाज माझ्या कानी आला. मी दुर्लक्ष केलं , परत तेच. माझ्या शेजारी बसलेली मुलगी cell च्या screen वर काही-तरी पाहून हसत होती. आता A .C . बसचे तोटे मोजा.... बस मध्ये बाहेरचा आवाज तर येत नाही पण या शांततेत लहान आवाज ही स्पष्ट ऐकू येतो. मी परत डोळे मिटले. पण तिचं हसणं माझी झोप पळवण्यात यशस्वी ठरलं. आता एका मुलीला काही बोलणं किती रुक्ष वाटेल, म्हणून मी कानांना headphones लावले. गाणी ऐकत असताना माझं लक्ष तिच्या screen कडे गेलं. एक romantic  चित्रपट चालू होता आणि त्यातील scenes पाहून तिला फार मज्जा वाटत होती. प्रयत्न फार केले पण तिचा चेहरा काही दिसला नाही. तरीही अधून-मधून तिचं हसू ऐकू येत होतं.

माझ्याकडे न पाहता तिनं तिचा हात मधल्या handle वर ठेवला. चुकून तिच्या हाताचा धक्का माझ्या  हाताला लागला. दचकून ती पालटली.इतक्या वेळा नंतर का होईना,  चेहरा दिसला. वाटलेला
तशी काही नटी सारखी नव्हती. अगधी साधारण रूप व नाक-नक्षा. तिनं  आपला हात सरकवला. माझा हात मी न हलवता तिथच ठेवला. Why should I?

माझी अशी प्रतिक्रिया पाहून ती नक्की चीढली असावी. पण माझ्या कडे न पाहता किंवा मला काहीच न बोलता, तिनं स्वतःला सीटवर adjust केलं. तिनं तीझी bag आमच्या मध्ये ठेवली आणि परत चित्रपट पाहण्यात मग्न झाली. मी मनातल्या मनात म्हणालो.... बरं झालं! आणि मी परत डोळे मिटले. पण झोप काही लागत नव्हती. गाडीच्या बाहेर हिरवळ पहावी म्हणून खिडकीच्या बाहेर नजर फिरवली आणि अचानक असं जाणवलं  कि आपल्या शेजारीच हिरवळ आहे. ते साधारण रूप आता काही साधारण वाटत नव्हतं. नकळत मी तिला पाहत राहिलो. कधी या हाताने तर कधी त्या हाताने हनुवटीला आधार देत होती. तर कधी केस खोलुन केस बांधणे. कधी केसां सोबत खेळणं. सतत काही तरी चूळ-बुळ चालू होती. मग मधेच हासणं. आई शपथ!! कसली गोड दिसत होती ती! मी तिची अदा पाहताच राहिलो. आपल्याला कुणी तरी पाहतय असं वाटताच ती माझ्या कडे पाहू लागली आणि मी लगेच खिडकी बाहेर पाहू लागलो. गाणी ऐकतोय असं दर्शावलं. पण सत्य काय ते तिला हि माहित होतं. ती परत चित्रपटात गुंग झाली आणि मी... मी तिला पाहण्यात.

तिच्या हुशारीच काय सांगू? ती माझ्या कडे पाठ करून असं  angle लावून बसली होती कि ती cell च्या screen मध्ये माझा प्रतिबिंब पाहू शकत होती. मी पण दीड शहाणा. मी चष्मा लावला. आता कसा कळणार?

थोड्या वेळात snacks break झाला. मी एक वाडा-पाव घेऊन बस जवळ तिची वाट पाहत उभा राहिलो. काय आज-कालच्या मुली! figure जपण्य करिता तिनं फक्त एक diet cokeचा कॅन आणला होता. चार तास त्या 300ml पाण्यावर कशी राहणार ही! कमाल आहे.

आता सीटवरची position बदलली होती. मधली bag गायब झालेली. कॅन संपेपर्यंत चित्रपट बंद होतं. आरामात बसून, खिडकी बाहेर पाहत, ती drink enjoy करत होती. handle वर माझा हात होता पण आता ती स्वतःसाठी जागा घेत होती. या वेळी मी माझ्या हाताला सरकवला. ठेव बाई. तिनं नजरही फिरकवली नाही आणि मी तिला एक टक पाहत होतो. संपलेला कॅन सीट खाली ठेवून ती परत चित्रपट पाहू लागली. अचानक ती खुर्चीत खाली सरकून, आक्रसून बसली. मला काही काळेनासं झालं. थोड्या वेळाने ती सीटच्या वरच्या भागात पाहू लागली. मागच्या माणसाने त्याचा हात सीटवर ठेवला जे तिला आवडत नव्हतं. मी वळून पाहिलं. एक लोचट व्यक्ती सीटच्या मधून तिला पाहायचं प्रयत्न करीत होता. कुणाच ठाऊक का... पण माझं रक्त सळसळू लागलं. हा माणूस अर्धा-म्हातारा आणि आपल्या नातीच्या वयाच्या मुलीला पाहतोय. बस मध्ये scene  तर करायचा नव्हता पण मला तिचा त्रास ही पाहवत नव्हता. काही न बोलता, मी त्याचा हात उचलून माझ्या सीटवर ठेवला. हे पाहून त्यानं स्वतःचा हात काढला आणि स्वतःची चूक समझताच सभ्य माणसा सारखा बसला. मला काही राहवत नव्हतं. रागाने माझे डोळे लाल झाले होते पण या वृद्ध व्यक्तीवर काय राग काढणार, म्हणून मी गप्पा बसलो. इतकं सगळं घडत होतं आणि ती एका निरागस मुला परी चित्रपट पाहत होती. तिला पाहत माझा राग ही नाहीसा झाला. तिला हसताना पाहून मी ही  हसू लागलो. तेव्हड्यात तिनं माझ्याकडे पहिलं. मी परत खिडकी बाहेर पाहू लागलो. सीटवरचा हात गायब झाल्याचं पाहून ती परत नीट बसली.

प्रवासाचा शेवटचा दीड तास उरला असेल जेव्हा तिचा चित्रपट संपला. ती घरी call करून तिच्या येण्याची वेळ कळवत होती. तिचं बोलणं ऐकत कळलं ती माझ्याच गावी उतरणार आहे.  त्या उरलेल्या प्रवासात मन भरून तिला पाहून आणि ऐकून घेतलं. तिच्या बद्दल अजून काही कळलं  नाही. कमीतकमी नाव तरी कळलं असतं. प्रवास संपत आला होता आणि माझ्या मनात महम्मद रफी गाऊ लागले,
  
 "..... और थोड़ी देर में बस, हम जुदा हो जायेंगे, 
आपको धुंडुंगा कैसे, रास्ते खोजायेंगे, 
नाम तक भी तो नहीं, आपना बताया आपने...."
खरच या चार तासाच्या प्रवासात असं  काही घडेल याची कल्पना ही  केली नव्हती. माझ्या "दिल" चं  "दर्द-ई-दिल" झालं होतं. हो-हो म्हणत गाडी डेपोला लागली. मी तिच्या नंतर उतरलो. खाली उतरताच तिला शोधलं तर ती कुठंच दिसत नव्हती. वाऱ्यासारखी आली आणि निघून गेली आणि  माझ्या मनाला पूर्णपणे हलवून गेली. चार तासाची ती साथ, पुन्हा भेटण्याची ओढ लाऊन गेली.
--परिणीता
(15/8/2012)

Friday, July 6, 2012

बरसत आल्या अमृत-धारा

"तिला पाऊस आवडतो, त्याला पाऊस आवडत नाही....." ही ओळ तर सर्वांनाच माहित आहे. पण, यात एक twist टाकला तर....

"त्याला पाऊस आवडतो, तिला पाऊस आवडत नाही." तर ते आमच्या सारखं  काही होईल. मला पाऊस अत्यंत प्रिय... माझा आवडता ऋतू म्हणालं तरी चालेल आणि तिला पाऊस मुळीच आवडत नाही.

पण मला ती आवडते आणि फार-फार तर या पावसा सारखीच वाटते. तिची रूपं व तिचा स्वभाव पावासागत आहे. पावसाचं आगमन म्हणजे आभाळ दाटून येतं. घन-दाट काळ्या ढगांनी अंधार पसरतं आणि बारसण्या आधी गर्जना होते. त्या दाटून येणाऱ्या आभाळाने रानो-माळ  उमलून जातात तसेच माझे मन तिच्या भेटीच्या आशेने फुलते. ती येणार... हीच गोष्ट मनाला ओढ लावाण्या करिता पुरेशी असते. मग आता वर्षाव होईल.... नंतर होईल... असं करत मी तिची वाट पाहत असतो.

गड-गाड्त्या  आभाळा परी माझे हृदय धड-धडू लागतं आणि ती एकदा समोर आली कि सगळं शांत होतं. जणू पावसा पूर्वीची शांतता.

तिच्याशी बोलणं  म्हणजे पावसाच्या सारीच जणू. कधी मध्यम तर कधी अचानक जोरात बरसतात. तिचं बोलणं आणि मधेच हसणं अगधी वार्यावर खेळणाऱ्या त्या लहान आणि हलक्या थेंबां सारखं असतं. ही थेंबे जशी अलगद वाहणाऱ्या वार्यावर उडतात आणि अलगद आपल्या चेहर्याला स्पर्शतात तशी ती हस्ते. तिचं  हसू, नजरेला लोभतं, कानाला सुखावतं आणि थेट हृदयाच्या अंतरात सामावतं. ओंजळीत भरून येणाऱ्या थेंबांसारखे मी ते हृदयात धरतो आणि आठवणीत सजवतो.

सूर्याच्या कडक उन्हात, थंडं-गार आणि सुखावणाऱ्या  त्या सरींप्रमाणे माझ्या मनाला ही शीतलता लाभते. अन कधी याच शीतल हसुला विजेची धार येते. कधी चुकून व कधी कळून तिचं मन दुखावलं तर ती लखलखत्या विजे परी दिसते. तात्पुरतं "रौद्र रूप" ही दिसतं. पण ते हि विजेच्या चमकण्या सारखंच असतं. अगदी थोड्या वेळासाठी. माझ्या स्वभावावर रागावते आणि थोडं  ओरडून झालं  कि तिच्याच डोळ्यांतनं पाणी वाहू लागतं. त्या धारांना थांबविण्या करिता जमेल ते उपाय मी करतो आणि तिला हसवतो. वादळ थांबल्या वर आभाळात जसं  इंद्रधनुष येतं तसं मस्त हसून माझ्या प्रयत्नांना यश मिळवून देतं.

तिला तर कळतच नाही कि मला पाऊस का आवडतो. तिला काय माहित, या पावसात मी तिलाच पाहतो, तिलाच शोधतो. पावसाच्या  प्रत्येक थेंबांत तिचा स्पर्श जाणवतो. पावसाच्या संथ धारां पासून ते वादळी रुपा पर्यंत तीच जाणवते. तिच्या येण्याने माझ्या आयुष्याला अमृताच्या धारा लाभ्ल्यात.
 
-- परिणीता
 (6 / 7 / 2012)

Tuesday, April 3, 2012

ती गेली तेव्हा...





.... रात्रीचे ११-११.१५ ची वेळ असेल. सगळी कडे शुक- शुकाट होता. रात किड्यांची किर्र-किर्र चालू झाली होती. रस्ते, गल्ल्या ओस पडल्या होत्या. रस्त्याच्या कोपऱ्या वरचा दिवा शांततेत एकटाच उभा होता. त्या वेळी एका घराचे दार उघडले. चोर पावलांनी एक व्यक्ती बाहेर पडली. किल्ल्यांची छ्न-छ्न ऐकू येत होती. आवाज होऊ नये म्हणून, ती व्यक्ती, गाडीला धक्का मारून रस्त्याच्या पाली कडे घेऊन गेली आणि नंतर गाडी चालू करून शहरा बाहेरच्या सरोवारावर जाऊन बसली. नभात शुक्ल पक्षातल्या चंद्राने चांदणं पसरवलं होतं. सरोवराच्या पाण्यावर वाऱ्याने तरंग येत होते. त्या शांततेत तो त्यांच्या रोजच्या जागी बसला होता. त्याच्या आयुष्यातील आता पर्यंतचा एक मोठा निर्णय त्यानं घेतला होता. त्याला तिच्यात आणि कुटुंबात नं एकाला निवडायचं होतं. आणि त्याने तिला विसरायचं ठरवलं होतं. आई वडील आधी.


त्याने आकाशाकडे पहिले. लुक-लुक्त्या ताऱ्यांत तो तिला शोधात होता. तिच्या सोबत घालवलेल्या वेळेची आठवण करत त्याचे डोळे भरून आले. पहिल्या अश्रूला पुसत त्याने गाडी कडे पहिले. त्याचे मन अगदी भरून आले. एक एक तो क्षण हळू-हळू त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागला. तिची भेट. तिच्या मुळे हसणे. तिच्या सोबत एकांत.तिच्या आधी कुणीच इतकं जवळचं नव्हतं आणि या पुढे होणं हि शक्य दिसत नाही.


त्याचं मन त्याच्याशी वाद घालत होतं.

-का असे करतोयस?
-माझ्या समोर अजून कुठलाच पर्याय नाही आहे.
-तिच्या गेल्या नंतर, तिला विसरू शकशील का?
-का नाही?
-प्रश्नाच्या उत्तरात प्रश्न!
-मग काय बोलू?
-खरं
-खरं हेच आहे. आई-बाबांची इच्छा आहे. मी त्यांचं मन कसं मोडू?
-मग स्वतःचं काय? त्याचं काहीच नाही?
-नाही कसं! आहे की. माझ्या आयुष्यात तिची साथ इतकीच होती. आता तिला जावं लागेल.
-आणि तिचा विचार कोण करणार?
-मीच करीन. विचार केलाय. तो तिला नीट ठेवेल. माझा best friend आहे तो. मी ओळखतो त्याला. त्याला ती खूप आवडते. तिला ही तो आवडेल. तो मनाने खूप चांगला आहे.
-म्हणजे, तिच्या जाण्याने तू खुश आहेस तर...
-हो.
-मग खुश दिसत का नाही आहेस?
-मन भरून आलंय रे... आता ती माझी नसणार. ती माझी नाही आहे....या विचाराने मनावर किती वार होतात, काय सांगू?
-मग आता काय करायचं ठरवलंय?
-तिच्या आठवणीत जगणे. हे इतकं हे कठीण नाही आहे.
-हो रे... जमेल तुला.
-कसं जमणार नाही तेच पाहतो.... पण जेव्हा-जेव्हा तिची आठवण येईलना.... तेव्हा-तेव्हा डोळे भरून येतील. कधी असहाय्य झालं तर दुरूनच पाहीन तिला. किती छान वेळ घालवलेला आम्ही सोबत. तिला पहिल्यांदा पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो. आणि गम्मत म्हणजे... तिला हि मी आवडलो. मग काय.... कशाचीच परवाह नव्हती. आकाशातल्या पाखरांवानी सगळी कडे फिरायचो...समुद्र किनारी, डोंगरांन वर, गाव-खेड्यात... सगळी कडे. तिला हि ही सगळी ठिकाणं माझ्या सारखेच आवडतात. highway वर फिरण्याची वेगळीच मज्जा असायची. त्या मोकळ्या वाऱ्यात, त्याच्या सोबत. उन-पाऊस याची तर कधीच भीती नव्हती. एकदा ठरलं की ठरलं. हिवाळ्यातल्या पहाटेच्या वाऱ्यात....आणि पावसात ते चिंब भिजणं... तुला काय सांगू? किती बरं वाटतं तिच्या सहवासात. पावसात भिजणे आणि त्या माझ्या ओल्या हातातने तिला केलेला स्पर्श... शब्दच नाहीत बोलायला...
-आवर रे...
-हो. आवरायलाच हवंय. या पुढे असं काहीच नसणार.


उशीर होत होता. रात्र तिसऱ्या प्रहरात प्रवेश करत होती. त्याने गाडी कडे पहिले आणि एक दीर्घ श्वास सोडला.

दुसऱ्या दिवशी लवकर उठून तयारीला लागला . अंघोळ आणि नाश्ता होतोयचं तर राज, त्याचा मित्र, दारात उभा होता.

"अरे राज... ये-ये... नाश्ता कर..."
"नको रे. करून आलोय."
"मग... सगळी arrangement झाली का?"
"कुठे रे.... बाबा १५ हजारावर एक पैसा देत नाहीत. जेम-तेम २० हजार जमा झालेत."
"चालेल की... आपलं काय ठरलंय? तू ५ नंतर दे. ती तुझीच आहे."
"बस क्या यार..... ती आधी तुझी आहे. मग माझी. मी तिला कायद्यानं माझी बनवणार. नाही तर नको."
"कसला कायदा.... सोड ते सगळं. मी म्हणालोना ती तुझी आहे. मग कसले कायदे मांडतोयस?"
"thank  you यार... तूच माझा खरा मित्र आहेस."
"anytime friend... anytime..."
"ए... पण कधी वाटलंना तर तू तिला बाहेर घेऊन जाऊ शकतोस."
"ह्म्म्म.... पण आता तो अधिकार तुझा आहे."
"तू तर असं म्हणतोयस जणू ती माझी लग्नाची बायकोच आहे!"
"अरे.... मग माझी तरी कुठे आहे?" दोघे जोरात हसायला लागले. kitchen मधून तेव्हड्यात आईचा आवाज आला.
"काय रे.... आज college ला उशीर नाही होत आहे का?" म्हणत आई hall मध्ये आली. "चला.. आवरा पटा-पट."
दोघांनी आपली bag उचलली आणि निघाले.


"हे घे... आता पासून हि तुझी..." असं म्हणत रोहनने राजच्या हातावर किल्ल्या ठेवल्या. "हि माझी लाडकी bike आहे रे... जपून चालव. हिला काही झालं तर गाठ माझ्याशी आहे. हीच तर माझी एकुलती एक darling आहे."
"तुझीच काय... आज पासून माझी पण darling. पण काय रे... तू हिला विकायला तयार कसा झालास? किती चांगल्या condition मध्ये आहे हि अजूनही. अगदी नव्यासारखी जपली आहेस."
"अरे... आई-बाबांना car घ्यायची आहे. मग bike कशाला ठेवावी? खिश्याला परवडणार नाही...petrol चे rates पाहिलेत का? किती महाग झालं आहे आली कडे."
"हो रे... म्हणूनच माझे बाबा पण विरोध करत होते."
"चला... आज पासून हिचे मालक तुम्ही. तर तूच चालव. मी मागे बसतो..." रोहन आणि राज bike वर बसले आणि college ला निघाले.


--परिणीता
(१--४-२०१२)   

Sunday, March 25, 2012

का रे दुरावा?

त्या सकाळी डोळे उघडले तेव्हा काळजात धडधडत होते . सकाळच्या थंड कोवळ्या वाऱ्यात ही घाम फुटत होता. भीतीने मन कवर-बावरं झालं होतं. पाहिलेलं स्वप्न खरं ठरलं तर? थोडा वेळ कशाचाच भान नव्हता. उशी खाली ठेवलेला mobile phone काढला आणि त्याचा number dial केला. पण कुणीच  उत्तर दिले नाही. गेले काही दिवस असच काहीसं चाललय. त्याला call करते पण तो उत्तर देत नाही. आज मात्र गप्प बसता येणार नाही. खरं काय ते कळायलाच पाहिजे. म्हणून आज मी त्याला भेटण्याचा निर्णय घेतला. तो येऊ शकत नसेल पण मी तर जाऊ शकते ना.
पटकन तयारीला लागले. नाश्ता होई पर्यंत काय घालायचे, कसे जायचे या सगळ्या गोष्टींचे विचार चालू होते. ठरलं तर. त्याला लाल रंग आवडतो  म्हणून लाल रंगाचे एखादे t-shirt किंवा top घालावा. पण नंतर वाटले, ३ महिन्या नंतर त्याला भेटणार. चांगलं दिसायला हवं म्हणून ethnic wear असावं. मग फिरत-फिरत गाडी सलवार कमीज वर येऊन थांबली. मुलगीच ना मी. कपडे झाले की त्यावर साजेसं गळ्यातलं, कानातले आणि सलवार कमीज म्हणजे हातात कमीत कमी डझन दोन डझन बांगड्या ही हव्यात. मग टिकली कशी विसरायची! सकाळचा एक तास असाच निघून गेला. कपड्यांची इस्त्री, handbag, चपला.... चापलांमध्ये  पण उंच टाचांच्या घालाव्यात की साध्याच चालतील! किती विचार आणि किती ते पर्याय.
तयारी झाल्यावर शेवटची एक झलक पहावी म्हणून आरश्या समोर उभी राहिले. लाल-हिरव्या dress वर बांगड्या आणि टिकली शोभत होती. necklace आणि ear rings जास्तच झग-मग वाटत होते म्हणून त्यांना काढून ठेवलं. घड्याळात ११ वाजत होते. bus depot मध्ये विचारपूस करताना कळले प्रत्येक १५ मिनिटांवर पुण्याला जाणाऱ्या गाड्या आहेत. पण पुण्यात कुठे? ते काही माहित नाही. राहू दे... तिथे पोहोचल्यावर, त्यालाच call करून विचारेन. जेव्हा त्याला कळेल की मी इतक्या लांबून त्याला भेटायला आली आहे , तर तो मला टाळूच शकत नाही. गाडीची वाट पाहत उभी असताना, त्याला भेटण्याचा  आनंद चेहऱ्यावर दिसत होता. मनात भीती होती, कदाचित त्याला आवडले नाही तर? आणि पुढच्या क्षणी वाटे की असे काही नाही. तो समजून घेईल. गाडी फलाटावर लागली. bus क्रमांक, ठिकाणाची उद्घोषणा झाली. माझ्या चेहऱ्यावर हसू फुटले. मनात आनंद मावेनासा झाला.
गाडीवर लागलेली पाटी परत वाचली आणि गाडीमध्ये चढले. नशिबाने खिडकी जवळची जागा मिळाली. दुपारची वेळ म्हणून गर्दी नव्हती. प्रवास सुरु झाला. गाडी महामार्गाने जाणार होती. आज वर कधी हा नवीन महामार्ग पहायचा योग आला नव्हता. आजचा दिवस अतिशय भाग्यशाली असावा म्हणून तर आज इतक्या चांगल्या गोष्टी घडत आहेत. खिडकी बाहेरचा निसर्ग डोळ्यांना सुखावत होता. पावसाचा ऋतू होता. सगळीकडे हिरवळ दाटली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला हिरवे शेत, लहान खेडे, डोंगर, दऱ्या व मन हेरावणारे धबधबे होते. छान गार वारा लागत होता. डोळे बंद करून मातीचा सुगंध अनुभवत होते. डोळे झाकताच, त्याची छवी डोळ्यांत नांदू लागली.
आमची सर्वात पहिली संध्याकाळ आठवली. जेव्हा तो पुण्यावरून फक्त ४ तास माझ्या सहवासात घालवायला, कुणाला न सांगता, भेटायास आला होता. एका बाकड्यावर बसून पूर्ण संध्याकाळ काढली. जेव्हा त्याची निघायची वेळ आली, तेव्हा कसं-बसं होत होतं. हे प्रेम का? असं मी विचार करत होते. पण उत्तर काही सापडले नाही. तेवड्यात conductor ने ticket म्हणून स्वप्नांच्या महामार्गावर गती रोधक लावला. हातातलं पुस्तक तसच होतं. वाचायची इच्छा होत नव्हती. mobile काढून सारखी पाहत होती पण त्याचा call किंवा sms नव्हता. असा किती कामात आहे हा!

खोपोलीचा टोल नाका लागला आणि ओळखीचा फाटा दिसला. दूरवर माथेरानचा डोंगर दिसत होता. पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. पावसाळ्यात त्यानं झाड-वेलींची चादर ओढली होती.
एके दुपारी अचानक call करून बोलवून घेतले आणि माथेरानला जायचं का असं विचारू लागला.classes, घर आणि office मध्ये फिरायला वेळच मिळत नाही. मग संधी चालून आली आहे तर का जाऊ नये? म्हणून हो म्हणले आणि आमची स्वारी निघाली माथेरानला भेटायास. धगधगत्या उन्हात अर्धा रस्ता चढून गाडीची मोटार तापली होती. गाडी सावलीत लावली आणि bonnet उघडलं. आजू-बाजूच्या परिसरात थोडा फेर-फटका केला. रस्त्याच्या बाजूने जाणारी toy train चे tracks होते. अर्धा पाउण तासानंतर पुन्हा पुढचा प्रवास सुरु झाला. तो सतत बोलत होता. हा अमुक स्टोप ती तमुक जागा. मला त्यातील नावं तर लक्षात नाही पण त्याचं वर्णन चालू होतं. "लहान पणा पासून मी कित्येकदा इथे येऊन गेलोय" असं सारखं म्हणत होता.
मग एका टप्या नंतर वाहने नेण्यास बंदी होती. तर पुढचा रस्ता पाई जायचा होता. जंगल तर म्हणणार नाही पण झाडे दाट होती. त्यातील पाउल वाट.... भर उन्हात ही थंड सावली होती. पायाशी लाल मऊ माती होती. प्रत्येक पाउला सोबत लाल माती उडून माझ्या jeans वर बसत होती. यशच्या म्हणण्यावर मी pant ला थोडं वर आवरले.

थोडे दूर वर जाऊन 'पाय दुखताहेत' असा बहाणा केला आणि चपला हातात धरून उभी राहिले. पण माझे ऐकेल तर तो यश कसा? आधी तर मला चप्पल काढू देत नव्हता आणि नंतर स्वतःची चप्पल घालत नव्हता. मला त्या मऊ मातीवर मोकळ्या पायाने चालायचं होतं म्हणून इतके नखरे चालू होते. आणि तो माझ्या सगळ्या प्रयत्नांवर मात करत होता. मी त्याला म्हणाली, "चपला पायाला लागत आहेत." तर बळजबरीने स्वतःच्या चपला माझ्या पायात घालू लागला. मग मला खरं काय ते सांगावं लागलं. "मला चपला घालायच्या नाही आहेत." आणि मी जागेवर उभी राहिली. तो चालू लागला होता तरी ही वळून मागे आला आणि गंभीरतेने विचारले, "चालणार आहेस की नाही?" मी त्याच्या कडे न पाहता, मान हलवून नकार दिला. बघताच क्षणी, त्याने मला उचलून घेतलं. होता-नव्हता तो राग तिथेच त्याच्या कुशीत विरघळला. हेच प्रेम का?

गाडी आता लोणावळ्यात पोहोचली होती. वाऱ्यात गारवा वाढला होता. रस्ता डोंगराच्या कडेला कोरलेला होता. सगळी कडून छोटे-छोटे धबधबे वाहत रस्त्यावर येत होते. अजून उंचावर जाताच रस्ता ढगांमध्ये हरवला होता. रिम-झीम पाऊस चालू झाला. खिडकीची काच लावली. काचेवारचे टेंब पाहून, संदीप खरेंच्या गाण्याची ओळ आठवली...
"इथे दूर देशी माझ्या, सुन्या खिडकीच्या पाशी,
झाडे सर काच भर सडा,
तूच-तूच, तुझ्या-तुझ्या, तुझी-तुझी, तुझे-तुझे,
सारा-सारा, तुझा-तुझा सडा...."
अशाच थेंबांच्या सड्यात, माझ्याही डोळ्यात पाणी दाटलं होतं....
"पण तुला का भेटता येणार नाही?" मी स्वतःचे अश्रू आवरत विचारले.
"आईला संशय आलाय. बाहेर पडणं कठीण दिसतंय" यश म्हणाला.

"हे माझं वाक्य असायला हवं होतं."
"पण मी खर तेच म्हणतोय."
"खोटं. साफ खोटं. माझं कंटाळा आलाय ना ?

"नाही गं...."
"मग काय आहे? बोलना...."माझ्या निराशेचं रागात रुपांतर झालं.
त्याने माझ्या दिशेला पाहिलं आणि म्हणाला, "निघ आता. बस झालं."
मला माझा राग आवरला नाही आणि मी त्याच्या कानाखाली एक वाजवली. जे घडलं त्याने क्षण जसे थांबले. नकळत माझे अश्रू सांडू लागले. त्याने माझा चेहरा हातांत घेतला.
"अगं वेडा बाई.... रडू नका... तू म्हणतेस तसंच होईल."

याला प्रेम म्हणतात का?
आता मला राहवेना. गाडी देहू रोड मार्गे पुणे शहरात पोहोचली. मी त्याला sms करून कळवले. मी शहरात पोहोचे पर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ होईल. मग त्याला आधीच कळवावं. नाही तर हा कुणाबरोबर तरी निघून जायचा आणि उशिरा कळवलं म्हणून माझ्यावर खेकसायचा.
"guess wht? i am at dehu road..."
हा sms त्याला पाठवला आणि आतुरतेने त्याच्या प्रतिक्रियेची वात पाहत होते. वेळ पळत होता पण त्याचं उत्तर काही येत नव्हत. हा जर का असाच करणार आहे तर मला भेटणार कसा? तेवढ्यात किती दिवसानंतर त्याचा number माझ्या mobile screen वर झळकला. माझा चेहरा आनंदाने फुलाला होता आणि त्याच गतीने कोमेजला.


"i can't meet you. you go back."
या शब्दांत त्याचं उत्तर आलं. आता मला काहीच कळत नव्हतं काय करावं. मी त्याचा निर्णय बदलायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. हा-हा बोलता, गाडी शिवाजी नगरच्या वाहन तळात पोहोचली. या पुढे मी जाऊ शकत नव्हती. कदाचित त्याला थट्टा वाटली असेल. म्हणून मी PCO वरून call केला. या वेळी त्याने माझा call उत्तरला. घाबरुन मला कंठ फुटत नव्हता. तरीही मी त्याला कारण विचारलं.

"मी येऊ शकत नाही. तू दुसरी गाडी पकड आणि परत जा."
"पण का?"
"मला नाही भेटायचं. तू कोणाला विचारून आली आहेस? का आली इथे?"
पुढे त्याचा आवाज ही ऐकावासा वाटत नव्हता. त्याचं बोलणं संपलं आणि दोन्ही बाजूला शांतता झाली. मी ही काही बोलत नव्हती. एखादी मुलगी अशा वेळी कशी बोलणार...? रडेल, चिढेल, ओरडेल, पिसाळेल... काय करणार? मला यातील काही ही वाटत नव्हतं. माझ्या मनातली ती जागा, जी त्याच्या साठी ठेवली होती; माझ्या आयुष्यातले ते हवेहवेसे क्षण आणि त्या आठवणी जपून ठेवल्या होत्या; ते स्वप्नांचा महाल मी मनात बांधला होता, आता एका लाटेने कोसळताना दिसत होता. हाती काही दिसत नव्हते. सगळं संपलं होतं. एक सरासरी विचार मनात आला....
हा व्यक्ती जर माझा आता इतका तिरस्कार करतोय, तर पुढे कसं होणार? जर असं नातं माझ्या वाकण्याने जपत असेल तर पूर्ण आयुष्य मलाच वाकावं लागेल. जर मी हे नातं जपण्या करिता इतका पुढाकार घेतेय हेच त्याला कळले नाही तर या नात्याचे मोल काय राहील? या नात्याचे बंध कसे टिकणार?


आता मलाच निर्णय घ्यायचा होता. स्वतःसाठी, त्याच्यासाठी आणि आमच्या दोघांच्या आयुष्यासाठी. धीर धरून मी म्हणाले,"यश... झालं बोलून.... बरं झालं. अजून काही उरलं असेल तर ते ही म्हण. आज मी तुला शेवटची संधी देतेय. जितकं काही असेल ते बोल." मी त्याच्या उत्तराची अपेक्षा करत होते पण तो काहीच बोलला नाही.
"ऐक आता. आज बोलला आहेस. या पुढे कधीही बोलू नकोस आणि कधी ही मला तुझं तोंड दाखवू नकोस. आज पासून आपलं नातं... की जे काही होतं ते संपलं. यश... तुला शेवटचा bye..."
या आधी तो काही बोलेल, मी phone ठेवला. त्या दिवशी receiver ठेवताच त्याच्याशी असणाऱ्या सगळ्या तारा तुटल्या. त्यादिवशी पुण्यातनं परत येणारी मी, आधीची मी नव्हती.

परतीच्या वाटेवर, मी रडून घेतलं. खूप रडले. त्या दिवशी माझ्या प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा घात झाला होता. काल पर्यंत सगळं किती वेगळं होतं. आज पासून आयुष्य बदललय. या पुढे सगळं काही वेगळं असणार. कुणीतरी नसणार.... याचा विचार ही मनाला बोचत होता. त्याच्यावर इतका राग होता पण त्याला विसरणं कठीण आहे हे मात्र अटल सत्य आहे....

हेच प्रेम आहे का?

---परिणीता
(२४/३/२०१२)

Wednesday, March 14, 2012

सांज पिशी


सूर्य मावळतीला होता. समोर पसरलेल्या डोंगरमालांत नागमोडी  रस्त्यावर गाड्या धावत होत्या. त्यातील एक डोंगराच्या कडेवर बसणे आणि सांज पाहणे हे मला नेहमीच आवडतं. होय... ही जागा म्हणजेच लोणावळ्यातील tiger hills चा sunset point. रस्त्याच्या कडेला उंच कट्टे बांधले आहेत. त्या कट्ट्यांवर बसून पाय मोकळे सोडायचे आणि त्या थंड वारयात गरम-गरम मका खायचा. अशीच एक संध्याकाळ, पण काही वेगळी.  अशीच एक संध्याकाळ पण एका वेगळ्या व्यक्ती सोबत.

आजवर sunset point ला मित्र-मैत्रिणी सोबत अनेक वेळा जाउन आलेला, college च्या गप्पा आणि गोड-आंबट भांडणात वेळ घालवलेला. पण आता college संपले आणि व्यवसायाची वाट धरली. आयुष्यात थोडे serious व्हावे म्हणून चार पैसे कमवून घराची जबाबदारी घेतली. आणि मग तो क्षण आला जेव्हा कुणासाठी तरी जगावसं वाटलं. त्या व्यक्तिला पाहताच जणू मनात एका सेकंदात हजार तारा वाजतात. सामान्य वातावरणात ही अंगावर शहारं फुटतं. आणि boss समोर नसताना ही हृदयाचा ठोका वाढतो. अश्या व्यक्तीला पाहणं हे नजरेला किती सुखावतं हे शब्दांत तर सांगूच शकत नाही.

अशीच एक व्यक्ति, माझ्या सोबत sunset point ला आहे म्हणाल्यावर, माझ्या मनाची काय दशा असावी हे मला नव्याने सांगायची गरज भासत नाही.

आम्ही दोघे bike बाजूला लावून , sunset point ला मावळता सूर्य पाहत होतो आणि त्या सोबत लागलेल्या जुन्या आठवणींच्या सरी. खरं तर ती माझी जुनी मैत्रीण, पण तेव्हा असं काहीच नव्हतं. आयुष्यात mature होता-होता, तिच्यासाठी माझ्या भावना ही mature होऊ लागल्या.

त्या संध्याकाळी कळत नव्हतं की संध्याकाळ जास्त सुंदर आहे की ती? किंवा तिच्या असण्याने संध्याकाळ जास्त सुंदर झाली आहे?

तिच्या कडे पाहताना प्रत्येक वेळी हृदयाचे ठोका चुकत असे.  संध्याकाळच्या त्या लाल-तांबड्या प्रकाशात तिचं रूप काही वेगळंच झळकत होता. तिच्या गव्हाळ कांती वर पडणारं ते लाल - तांबडे उन्ह सोनेरी भासत होतं. तिच्या पासून अंतरावर बसलो होतो पण जेव्हा ती माझ्या कडे पाहत होती, तिचे नितळ डोळे, दवाच्या थेंबा परि वाटत होते. बोलता-बोलता सहज तिचा हात केस सावरायचा आणि मग तिचे केस वाऱ्यावर पुन्हा बागडत. माझ्याशी बोलताना तिच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव आणि प्रत्येक क्षणाला शब्दांच्या तालावर नाचणाऱ्या भुवया... माझे तर श्वास निघत नव्हते.

चांगले चाललं होतं... वाऱ्यावर उडणारे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. कुणास ठाऊक कसा पण माझा हात चटकन तिची बट सावरायला उठला. तिच्या कपाळाच्या कोपर्यातन बोटं फिरवत, ते केस तिच्या काना माघे अडकवताना, माझा हात तिच्या चेहऱ्याचा अर्ध वर्तुळ  प्रवास करून आला. खरं तर, तिच्या चेहऱ्या वरून हात उचलावेनसं झालं होतं. मोजुन दहा सेकंद लागली असतील, पण असं वाटले  जणु दुनिया एका चित्रपटाच्या scene सारखी slow motion मध्ये गेली आहे. त्या तेवढ्या वेळात आमची नजर भिडली आणि माझ्या हाताचा स्पर्श होताच तिच्या पापण्या झुकल्या. तिच्याही श्वासाची गति वाढत होती. आणि पटकन तिने nervousness मध्ये तिचे ओठ ओले केले. मनात आलंच होतं कि त्यांना एकदा स्पर्श करावं... हात हनुवटी पर्यंत पोचताना तिने माझ्या कडे पहिले. पण आता तीर कमानीतून सुटला होता. हात उचलताना माझा अंगठा सहज तिच्या ओल्या ओठांवर फिरला. असे काही घडल्यावर एक फटका अपेक्षित होता. पण तसं काही घडलं नाही. ती चक्क माझ्या कडे पाहून हसू लागली. मी पण हसत होतो.

पुढे काही बोलण्याची गरज नव्हती. आमच्या मधलं helmet उचलून मी दुसऱ्या बाजूला ठेवलं व तिच्या सोबत कट्ट्यावर बसलो. बोलण्यासाठी खूप काही होतं पण बोलावसं वाटत नव्हतं. मी तिचा हात माझ्या हातात  धरून ठेवला. सूर्य आता क्षितिजा वर पोचला होता. तिने अलगत तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवला.

हळू-हळू अंधार पसरू लागला. त्या संध्याकाळी पुष्कळ काही बोललो नाही पण मनांचा संवाद भरभरून झाला. अशी होती ती संध्याकाळ... थोडी वेडी.... थोडी पिशी... सांज पिशी...



---परिणीता (१४/३/२०१२)

Thursday, February 9, 2012

प्रिय तू

प्रिय तू,


तुला सरळ-सरळ सांगता येत नहीं आहे, म्हणून हे पत्र लीहावं लागतंय. गेले काही दिवस माझ्या स्वभावातला बदल तुला जाणवलाच असेल. पण मला आता माझ्या भावना स्वतःपाशी सावरता येत नाहीत. मनात जणू एखादं वादळ किंवा प्रचंड मोठी लाट उसळत आहे. खुप प्रयत्न केले तुला समजवायाचे, पण तुला माझी भाषाच समजत नाही.


मुद्दाम तुला भेटणे व काही न काही कारणाने तुला call करणे, यात फार बरं वाटायचं आणि अशा चांगल्या क्षणात अचानक तुझं आपल्या girlfriend बद्दल बोलणं फार लागतं. दिवस संपला तरीही तो विचार संपेना. सकाळी डोळे उघडल्या पासून रात्री झोपे पर्यंत मेंदूत कुठल्या तरी कोपऱ्यात तुझीच कुर-कुर चालू असते.


आता त्याचा चहा झाला असेल, आता तो फिरत असेल, कदाचित आता टपरीवर असेल, दिवस-दिवस भर हेच विचार चालू असतात. messenger वर ping  करायचं नसेल तरीही तासात कमीत-कमी दोनदा तरी तुझं 
status check करत असते. आणि मनातल्या मनात स्वतःला आवरत असते. "या गाढवाला  कधी बोलावसं वाटत नाही का?" असं  प्रश्न वारंवार चालू असतं.


दिवसातनं फक्त good morning किंवा good afternoon  म्हणण्या इतकच नातं आहे का आपलं? आणि जरी असं नातं आहे तर ते पुढे कधी जाणार? मी घाई तर करत नाही ना.... पण तो खरंच इतका धीर बांधून कसा आहे? त्याला मी आवडत नाही का? तो मला फक्त एक मैत्रीणच समझातो का? असे प्रश्न पण दिवस भर त्रास देतात.


किती झाले तरीही, मी एक मुलगी आहे. बाहेर हसत राहताना, आतून फार लागत असतं. आणि सतत स्वतःला आवरत असताना कधी तरी, कुठे तरी तोल जातोच. आणि आज तो दिवस आला आहे, कदाचित....


आज इतके दिवस पांघरून घातलेल्या गोष्टी बाहेर निघताना आढळताहेत. या अशा गोष्टींची फार भिती वाटते रे....मला बाकी काहीही करायचं झालं तर चालेल पण स्वतःशी कशी भांडू? स्वतःला काय समजावू? असं काय बोलू कि माझ्या आतली मी शांत होईल?


 बर..... दुसऱ्या कुणाला कळता कामा नये म्हणून कुणाला सांगता हि येत नाही आणि कुणाला विचारता हि येत नाही. बस. आतल्या आत कोंडल्या सारखं झालंय. नाईलाजाने खरी गोष्ट लपवत सल्ले मागितले तर ते satisfactory level ला पोहचत हि नाही. उरलेला पर्याय म्हणजे ज्याचा त्रास त्याने सहन करावा. मग मी एकटीच का त्रास सहन करायचा? तुझ्यामुळे त्रास होतोय तर तुला हि ते कळावं ना?

खरा सांगायचं झाला तर त्रास नाही रे.... पण तुझा दुरावा नाही सहन होत. अजून किती दिवस असं चालणार आहे? तुला कधी कळणार आहे? तू केव्हा बोलनार आहेस? तुला हे समजतंय का तेही काहि कळत नाही? तुझ्या पासून लांब राहणं खरच फार कठीण आहे. खूप म्हणजे खूपच कठीण. कदाचित देव माझी परीक्षा घेत असावा आणि पास झाल्यावर बक्षीस म्हणून तूच असावास. कदाचित.... असे म्हणूनच दिवस ढकलत आहे. पण तुला त्याची जनाच नाहीये. आणि जरी असेल तरी तू ते चांगलाच गुपित ठेवलं आहेस.

इतकं सगळं लिहिण्याचं तात्पर्य म्हणजे ............ आज मला तुला (भलेही एका क्षणासाठी का असेना) तुला गच्च मिठी माराविशी वाटतेय... तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून मन मोकळं करावसं वाटतंय.

तुझ्या आयुष्यामधली tensions लांब नेऊन तुला सतत हसवावसं वाटतंय. अगदी तशीच smile पहायची आहे, जशी marine drive ला, सूर्यास्ताच्या वेळी होती. खूप बरं वाटतं तुझा तो photo  पाहून. पण दुःख याचं आहे की मी कधी तुला तसं खुश होताना नाही पाहिलंय.

बस.... आता हे पत्र वाचून काही करू नको.... पण जेव्हा माझ्याशी बोलशील तेव्हा एकदा या पत्राचा विचार कर आणि मग बोल. कदाचित, तेव्हा तुझ्या बोलण्यातला बोचरे पणा कमी झाला असेल आणि मी ही एक मुलगी आहे (जी तुला पसंत करते) म्हणून तू मला एका मुली सारखं treat करशील. प्रेम तर नंतर ही होऊ शकतं..... काय? जमेल न रे तुला.....?


तुझीच मी,
secret admirer




















Tuesday, January 31, 2012

आज पुन्हा....

आज पुन्हा....
आज पुन्हा प्रेमात पडावासं वाटतंय
तुझ्याकरीता मनास लागलेली ओढ
अन जगता जगता पाहिलेले स्वप्नं गोड
सगळं किती हवंहवंसं वाटतंय
आज पुन्हा....

तुझ्यासोबत घलावलेला प्रत्येक क्षण
किती रोमांचातेने भरलेला असतो
तुझ्या संगतीत घलावालेला वेळ
किती भरभरून जागलेला असतो
ते क्षण, ती वेळ सारं धरून ठेवावंसं वाटतं
आज पुन्हा....

तुझ्या हास्यात विरघळलेली सांज
मिठीत धरलेली ती रात्र
समुद्राच्या लाटांवर पसरलेलं चांदणं
अन लाटांवर हेलावणारी नाव...
डोळ्यांत जसंच्या तसं साठवावंसं वाटतं
आज पुन्हा....

कही नसताना असण्याचा भास
मनास लागलेला तुझाच ध्यास
श्वासाश्वासात विरघळत जाणारा तुझा स्पर्श
अन तुझ्या नजरेतलं माझ्यासाठीचं हसू
तू , तू आणि फक्त तूच असतोस
मिटलेल्या डोळ्यांत
हृदयाच्या स्पंदनात
मनाच्या भासात, तनाच्या श्वासात
भोवतीच्या सर्वांत
सर्वस्वाताही तूच दिसतोस
तुझयातच सामावणारं माझं मीपण
मग आंगोपांगी पाझरत राहतं....
आज पुन्हा....

कसं सांगू तुला?
कधी माझ्या डोळ्यांतही वाचना...
दिसतील तुला तुझीच रुपं
तूच भरून उरलायस या देहावरच्या साजात
शब्दावीण जपलेला तुझ्या माझ्या नजरेतला संवाद
आता देतायत याचीच साक्ष....
अव्यक्त काही.... काही न उलगडलेले
होऊ पाहतायंत माझ्या जगण्याचा श्वास....

परिणीता
(२३/१/२०१२)