Friday, July 6, 2012

बरसत आल्या अमृत-धारा

"तिला पाऊस आवडतो, त्याला पाऊस आवडत नाही....." ही ओळ तर सर्वांनाच माहित आहे. पण, यात एक twist टाकला तर....

"त्याला पाऊस आवडतो, तिला पाऊस आवडत नाही." तर ते आमच्या सारखं  काही होईल. मला पाऊस अत्यंत प्रिय... माझा आवडता ऋतू म्हणालं तरी चालेल आणि तिला पाऊस मुळीच आवडत नाही.

पण मला ती आवडते आणि फार-फार तर या पावसा सारखीच वाटते. तिची रूपं व तिचा स्वभाव पावासागत आहे. पावसाचं आगमन म्हणजे आभाळ दाटून येतं. घन-दाट काळ्या ढगांनी अंधार पसरतं आणि बारसण्या आधी गर्जना होते. त्या दाटून येणाऱ्या आभाळाने रानो-माळ  उमलून जातात तसेच माझे मन तिच्या भेटीच्या आशेने फुलते. ती येणार... हीच गोष्ट मनाला ओढ लावाण्या करिता पुरेशी असते. मग आता वर्षाव होईल.... नंतर होईल... असं करत मी तिची वाट पाहत असतो.

गड-गाड्त्या  आभाळा परी माझे हृदय धड-धडू लागतं आणि ती एकदा समोर आली कि सगळं शांत होतं. जणू पावसा पूर्वीची शांतता.

तिच्याशी बोलणं  म्हणजे पावसाच्या सारीच जणू. कधी मध्यम तर कधी अचानक जोरात बरसतात. तिचं बोलणं आणि मधेच हसणं अगधी वार्यावर खेळणाऱ्या त्या लहान आणि हलक्या थेंबां सारखं असतं. ही थेंबे जशी अलगद वाहणाऱ्या वार्यावर उडतात आणि अलगद आपल्या चेहर्याला स्पर्शतात तशी ती हस्ते. तिचं  हसू, नजरेला लोभतं, कानाला सुखावतं आणि थेट हृदयाच्या अंतरात सामावतं. ओंजळीत भरून येणाऱ्या थेंबांसारखे मी ते हृदयात धरतो आणि आठवणीत सजवतो.

सूर्याच्या कडक उन्हात, थंडं-गार आणि सुखावणाऱ्या  त्या सरींप्रमाणे माझ्या मनाला ही शीतलता लाभते. अन कधी याच शीतल हसुला विजेची धार येते. कधी चुकून व कधी कळून तिचं मन दुखावलं तर ती लखलखत्या विजे परी दिसते. तात्पुरतं "रौद्र रूप" ही दिसतं. पण ते हि विजेच्या चमकण्या सारखंच असतं. अगदी थोड्या वेळासाठी. माझ्या स्वभावावर रागावते आणि थोडं  ओरडून झालं  कि तिच्याच डोळ्यांतनं पाणी वाहू लागतं. त्या धारांना थांबविण्या करिता जमेल ते उपाय मी करतो आणि तिला हसवतो. वादळ थांबल्या वर आभाळात जसं  इंद्रधनुष येतं तसं मस्त हसून माझ्या प्रयत्नांना यश मिळवून देतं.

तिला तर कळतच नाही कि मला पाऊस का आवडतो. तिला काय माहित, या पावसात मी तिलाच पाहतो, तिलाच शोधतो. पावसाच्या  प्रत्येक थेंबांत तिचा स्पर्श जाणवतो. पावसाच्या संथ धारां पासून ते वादळी रुपा पर्यंत तीच जाणवते. तिच्या येण्याने माझ्या आयुष्याला अमृताच्या धारा लाभ्ल्यात.
 
-- परिणीता
 (6 / 7 / 2012)