Train चा हॉर्न वाजला आणि मी त्या बाकड्या वर जाऊन बसलो. हळू-हळू वेघ धरत train फलाटा बाहेर निघाली. तिच्या सिग्नलचा लाल दिवा दूरवर दिसत होता आणि मग रात्रीच्या अंधारात नाहीसा झाला. मी तिथंच होतो. तिची वाट पाहत. पण ती नाही आली.
कधी येणार….
इतक्यात येणाऱ्या trainची घोषणा झाली. मी आपल्या केसां वरून हात फिरवला आणि trainच्या दिशेने पाहू लागलो. Train फलाटाला लागली. माझी नजर आशेने प्रत्येक दार पाहत होती. Train थांबली आणि लोकांची गर्दी झाली. हजारो चेहरे असतील तिथे. प्रत्येक चेहऱ्यात मी तिचा चेहरा शोधत होतो. कुणा मागून मला हळूच चोरून पाहणारा आणि समोर येताच गोड हसणारा.… पाहता-पाहता गर्दी संपली. Train हि गेली, पण मी तिथंच होतो. परत बाकडावर बसलो.
"कदाचित पुढच्या गाडीत असेल." असा म्हणत बसलो. बाजूचा भेलवाला मला पाहत होता.
"भेल लेलो साब. वक्त भी कट जायेगा."
भूक तर लागली होती. "एक …. ", बोलता-बोलता राहिलो. मनात आलं, तिनं पण काही खाल्लं नसणार. तिच्या सोबत भेळ खाऊ. असं काही चट-पट खाताना तिचे भाव पाहायला मज्जा वाटते. आधी तर तिला भेळीतली मिरची जाणवत नाही. एकदा तिखट जाणवलं कि नाक-डोळे लाल होतात. पण हसू नये… तिला त्रास होतो आणि मी…. तेव्हा indicator बदल्ला. मधली एक train cancel झाली होती.
फलाटावर अचानक लोक कुझ-बुझु लागले. कही तरी गड-बाड दिसतेय. कानी आलं, कुठे तरी train बंद पडली आहे. दादर!! हि पण तिकडनंच येते. फोने पण लागत नव्हता. अजून एक train लागली. तरीही तिचा काही पत्ता नाही. एव्हड्यात फोने वाजला. तिचा message होता.
'तू निघ. मला खूप उशीर होणार आहे.'
हे काय! असं message लिहितात का? कुठे आहे? कधी पोचणार? कशी आहे? हे कोण सांगणार? मुली मूर्खच असतात. कुणाला तरी आपली चिंता वाटते असं यांना काळात नाही का? वैतागून मी हि उठलो आणि चालू लागलो. माझे पाऊल काही पुढे पडत नव्हते. गप-चूप मी पुढच्या बाकड्यावर जाऊन बसलो आणि येणाऱ्या trainची वाट पाहत होतो.
दूरवर train येताना दिसली. परत केस निट केले, shirt वरना पण हाथ फिरवला. madamला सगलं कसं टाप-टिप लागतं. पण या train मधनं पण ती उतरली नाही. परत जागी येउन बसलो. राहून-राहून घड्याळ पाहत होतो. २० मिनटे मी तिथं बसून होतो. bagला मिठीत धरलं आणि काही क्षणांन साठी डोळे बंद केले. डोळे मिटून हि तीच भासत होती. आता ती माझा अंत पाहत होती. बस…. येउदे तिला…. अस ओरडेनना. पण तिने तर जायला म्हंटलं होतं. माझीच हौस म्हणून मी बसलो.
अर्धा तास होत आला. आता मी खरच निघालो. अजून एक train आली. मी थांबलो. तिला पाहण्याचा मोह आवरेना. अचानक अंगावर शहरे उमटले. त्या वैताग-वाणी गर्दीत मी तिला पहिला. तिची ती चोरटी नजर मला शोधत होती. मी लपतोय, इतक्यात तिनं मला पाहिलं. कित्ती हायसं वाटलं. कित्ती बारं वाटलं मला. ती हसत होती. तिला ओरडण्या अधी तिची बडबड सुरु झाली. मी नकळत तिच्या सोबत हसू लागलो. अशी हि रोज संध्याकाळची गंमत असते. तिच्या सोबत १० मिनटे चालण्या करिता मी १५ मिनटे वात पाहतो. दिवसाची ती २५ मिनटे अविस्मरणीय बनून राहतात.
(----परिणीता ५/४/२०१४)