"miss you too..."
असं म्हणत मी phone बाजूला ठेवला. miss you म्हणजे काय ते त्याला समझले असेल का कधी? दोन शब्द आणि बरंच काही म्हणून जातात. दिवसाच्या प्रयेक क्षणात असणारा आभास. पण बोलताना फक्त.... miss you...
सकाळी डोळे उघडण्या आधी माझं alarm snooze करत राहणं. तू मला हलवून उठवणं आणि alarm ला आराम द्यायला सांगणं. तरीही ५ मिनिट अजून असं म्हणत रोज उशिरा उठणं. त्यात "उशीर झाला" असं ओरडत पळापळ करणं. मग सर्व आवरून, office ला जाताना तुला उठवायचं आणि दिवसभराच्या सूचना देत तुला घाई-घाईत drop करायला सांगणं. आज पहिल्या alarm ला उठून शेजारची उशी रिकामी पहिली. त्यावर हात फिरवत तू असण्याचा आभास जाणवतो... तेव्हा I Miss You!
Office च्या धावपळीत lunch-break मध्ये तुला आठवणीने phone करणं. दुपार पर्यंत काय-काय घडलं आणि संध्याकाळी काय करायचं याचं plan आखणे. स्वयंपाक ठीक आहे कि नाही याची खात्री करणं. एखाद्या दिवशी call जमलं नाही तर message टाकून कळवणं. पण निवांत अन्न ग्रहण करताना तुझं स्मरण करणं. आज तो mobile जेवत असताना सोबत नसतो. त्यावर तुझं नाव झळकत नाही. जेवणाची आणि दिवसाची वार्ता होत नाही... तेव्हा I Miss You!
संध्याकाळी वेळेत काम आवरणं. पळत-पळत रोजचं market फिरून घर गाठायचं. उद्या काय स्वयंपाक करायचं याचा विचार करत तुला एक update call करणं. कधी तरी surprise भेट म्हणून तुझं किंवा माझं भेटीस येणं. आज office नंतर घरी जाण्याची घाई नसते. घरी आपली कोणी वाट पाहत नाही आहे हे विचार मनाला भेदतं... तेव्हा I Miss You!
Kitchen मध्ये अनेक प्रकारचे पकवान बनवून तुला खाऊ घालणं. बेचव असतानाही "वाह - वाह" म्हणत खाणं . आवडलेले पदार्थ बनवण्यास जेव्हा तू २-३ वेळा हट्ट करायचा तेव्हा मनातल्या-मनात आनंद वाटायचं. रोज काही नवीन बनवायची स्फूर्ती घेऊन रोजचा नवीन recipe शोधणं. कधी hit तर कधी flop. आपण काही नवीन घडवतो, याचा आनंद वाटायचं मला. आज त्या kitchen मध्ये counter समोर उभं राहून काहीच सुचत नाही. स्वतःसाठी instant noodles बनवताना पाण्यानी पोट भलंय असा समझतं. रिकाम्या kitchen मध्ये डोळ्यात पाणी तरळतं... तेव्हा I Miss You!
घरातील प्रत्ये वस्तू सजवताना त्याच्याशी जोडलेली गोष्ट आठवते. एक-एक दिवस त्या वस्तूत दिसू लागतं. त्या कुंडयांतील झाडांना पाहत, आपल्या घरी एक नवीन व्यक्ती आलाय असं आनंद असायचं. 'मोगरा कधी फुलणार? गुलाबाला काय झालाय बघना. शेवंती बघ कशी फ़ुललेय!' असं म्हणत तुझ्या त्यांची देखरेखचा वसा घेणं. आज सर्व झाडे फुललेली पाहून माझं हसू मात्र कोमेझतं... तेव्हा I Miss You!
कपाटातील तुझं गंध. माझ्या brush च्या शेजारी तुझा brush असणं. माझं साबण जास्त सुगंधित आहे म्हणून गुपचूप तू पण तेच वापरणं. कधी-कधी मला शंखा आली कि 'थोडंसं वापरलं होतं' असं म्हणत पळ काढणं. आज ते साबण खूप काळ संपत नाही... तेव्हा I Miss You!
रात्री bed वर पडताना अनेक आठवणी डोक्यात दाटतात. तेच-तेच विचार फिरू लागलात. Doctor म्हणतात सतत एकच विचार केल्या मुळे depression आहे. Doctor ला कोण समझवेल, तू दूर गेलास तरीही दुरावला नाहीस, पण तुझं दरवळ सतत असतं. दिवस भराचे डोळे मिटताना देवकडे आयुष्यभराचे डोळे मिटावे हे मागताना, I Miss You!
------परिणीता (१९/०५/२०२०)