हिरव्या शालूची बांधली गाठ
हिरव्या चुड्याने भरला हात
नवी स्वप्ने, नव्या आयुष्यात
उभारते नवे जीवन नव्या घरात
थोडं तू आणि थोडं मी
आपले आपण झालो कधी
'आहो! ऐकता का?' म्हणत
कळेना काळ गेला कधी
गोड आंबट क्षणात रंगले
आयुष्य तुझ्या माझ्या सावे
फुलापरी जपत आहे
घरटे आपल्या फुलांचे.
हिरव्या चुड्याने भरला हात
नवी स्वप्ने, नव्या आयुष्यात
उभारते नवे जीवन नव्या घरात
जोडली नाती नव्या माणसांशी
जुनी नाती हि घेऊनि संगती
पाऊल टाकते आपल्या घरी
आरंभ करते नव्या ओळखीची
सोडूनि आले बालपण आता
सुनपणाचा घेते वसा
घेऊनि हाती हा संसार
चालू दोघे नव्या वाटा
थोडं तू आणि थोडं मी
आपले आपण झालो कधी
'आहो! ऐकता का?' म्हणत
कळेना काळ गेला कधी
त्यातील ते रुसवणारे रुसवे
तर कधी असतील फुगवे
गंमत असे हि जगण्याची
आठवण ठसवे आपल्या नात्याची
गोड आंबट क्षणात रंगले
आयुष्य तुझ्या माझ्या सावे
फुलापरी जपत आहे
घरटे आपल्या फुलांचे.
सौभाग्य माझे तुझ्याशी बांधले
मांडुनी आयुष्य तुझ्या भोवती
प्राण माझा तूच आहेस
संसार माझा तुज्याच सोबती.
----परिणीता (०३/०६/२०२०)