प्रिय तू,
तुला सरळ-सरळ सांगता येत नहीं आहे, म्हणून हे पत्र लीहावं लागतंय. गेले काही दिवस माझ्या स्वभावातला बदल तुला जाणवलाच असेल. पण मला आता माझ्या भावना स्वतःपाशी सावरता येत नाहीत. मनात जणू एखादं वादळ किंवा प्रचंड मोठी लाट उसळत आहे. खुप प्रयत्न केले तुला समजवायाचे, पण तुला माझी भाषाच समजत नाही.
मुद्दाम तुला भेटणे व काही न काही कारणाने तुला call करणे, यात फार बरं वाटायचं आणि अशा चांगल्या क्षणात अचानक तुझं आपल्या girlfriend बद्दल बोलणं फार लागतं. दिवस संपला तरीही तो विचार संपेना. सकाळी डोळे उघडल्या पासून रात्री झोपे पर्यंत मेंदूत कुठल्या तरी कोपऱ्यात तुझीच कुर-कुर चालू असते.
आता त्याचा चहा झाला असेल, आता तो फिरत असेल, कदाचित आता टपरीवर असेल, दिवस-दिवस भर हेच विचार चालू असतात. messenger वर ping करायचं नसेल तरीही तासात कमीत-कमी दोनदा तरी तुझं
status check करत असते. आणि मनातल्या मनात स्वतःला आवरत असते. "या गाढवाला कधी बोलावसं वाटत नाही का?" असं प्रश्न वारंवार चालू असतं.दिवसातनं फक्त good morning किंवा good afternoon म्हणण्या इतकच नातं आहे का आपलं? आणि जरी असं नातं आहे तर ते पुढे कधी जाणार? मी घाई तर करत नाही ना.... पण तो खरंच इतका धीर बांधून कसा आहे? त्याला मी आवडत नाही का? तो मला फक्त एक मैत्रीणच समझातो का? असे प्रश्न पण दिवस भर त्रास देतात.
किती झाले तरीही, मी एक मुलगी आहे. बाहेर हसत राहताना, आतून फार लागत असतं. आणि सतत स्वतःला आवरत असताना कधी तरी, कुठे तरी तोल जातोच. आणि आज तो दिवस आला आहे, कदाचित....
आज इतके दिवस पांघरून घातलेल्या गोष्टी बाहेर निघताना आढळताहेत. या अशा गोष्टींची फार भिती वाटते रे....मला बाकी काहीही करायचं झालं तर चालेल पण स्वतःशी कशी भांडू? स्वतःला काय समजावू? असं काय बोलू कि माझ्या आतली मी शांत होईल?
बर..... दुसऱ्या कुणाला कळता कामा नये म्हणून कुणाला सांगता हि येत नाही आणि कुणाला विचारता हि येत नाही. बस. आतल्या आत कोंडल्या सारखं झालंय. नाईलाजाने खरी गोष्ट लपवत सल्ले मागितले तर ते satisfactory level ला पोहचत हि नाही. उरलेला पर्याय म्हणजे ज्याचा त्रास त्याने सहन करावा. मग मी एकटीच का त्रास सहन करायचा? तुझ्यामुळे त्रास होतोय तर तुला हि ते कळावं ना?
खरा सांगायचं झाला तर त्रास नाही रे.... पण तुझा दुरावा नाही सहन होत. अजून किती दिवस असं चालणार आहे? तुला कधी कळणार आहे? तू केव्हा बोलनार आहेस? तुला हे समजतंय का तेही काहि कळत नाही? तुझ्या पासून लांब राहणं खरच फार कठीण आहे. खूप म्हणजे खूपच कठीण. कदाचित देव माझी परीक्षा घेत असावा आणि पास झाल्यावर बक्षीस म्हणून तूच असावास. कदाचित.... असे म्हणूनच दिवस ढकलत आहे. पण तुला त्याची जनाच नाहीये. आणि जरी असेल तरी तू ते चांगलाच गुपित ठेवलं आहेस.
इतकं सगळं लिहिण्याचं तात्पर्य म्हणजे ............ आज मला तुला (भलेही एका क्षणासाठी का असेना) तुला गच्च मिठी माराविशी वाटतेय... तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून मन मोकळं करावसं वाटतंय.
तुझ्या आयुष्यामधली tensions लांब नेऊन तुला सतत हसवावसं वाटतंय. अगदी तशीच smile पहायची आहे, जशी marine drive ला, सूर्यास्ताच्या वेळी होती. खूप बरं वाटतं तुझा तो photo पाहून. पण दुःख याचं आहे की मी कधी तुला तसं खुश होताना नाही पाहिलंय.
बस.... आता हे पत्र वाचून काही करू नको.... पण जेव्हा माझ्याशी बोलशील तेव्हा एकदा या पत्राचा विचार कर आणि मग बोल. कदाचित, तेव्हा तुझ्या बोलण्यातला बोचरे पणा कमी झाला असेल आणि मी ही एक मुलगी आहे (जी तुला पसंत करते) म्हणून तू मला एका मुली सारखं treat करशील. प्रेम तर नंतर ही होऊ शकतं..... काय? जमेल न रे तुला.....?
तुझीच मी,
secret admirer
आता पत्र तर लिहून झालंय...तर मग सरळ-सरळ पण सांगूनच टाक ना.....:-)
ReplyDeletemazi suddha avastha patralekhikesarkhich zaleli aahe.....atishay bikat....uttarach sapadat nahiye....
DeleteDear Anonymous,
DeletePlease apla naav ani mail id kalavave
Atta kay upayog tyacha
ReplyDeleteSaglech sampale......perale te ugawalech nahi
Shushk ayushy......dushkalgrast pradeshasarakhe....
Mazya preyssine path firavili....ti nahi mhatli....
Atta mazi preyasi kafhikadhi thodi thofi khush pan aste...tumcha blog vachun mala prerana milate...dhanyawad..lihine chalu thevave...
ReplyDeleteTi aali
ReplyDeleteTine pahile
Aani tine jinkale