.... रात्रीचे ११-११.१५ ची वेळ असेल. सगळी कडे शुक- शुकाट होता. रात किड्यांची किर्र-किर्र चालू झाली होती. रस्ते, गल्ल्या ओस पडल्या होत्या. रस्त्याच्या कोपऱ्या वरचा दिवा शांततेत एकटाच उभा होता. त्या वेळी एका घराचे दार उघडले. चोर पावलांनी एक व्यक्ती बाहेर पडली. किल्ल्यांची छ्न-छ्न ऐकू येत होती. आवाज होऊ नये म्हणून, ती व्यक्ती, गाडीला धक्का मारून रस्त्याच्या पाली कडे घेऊन गेली आणि नंतर गाडी चालू करून शहरा बाहेरच्या सरोवारावर जाऊन बसली. नभात शुक्ल पक्षातल्या चंद्राने चांदणं पसरवलं होतं. सरोवराच्या पाण्यावर वाऱ्याने तरंग येत होते. त्या शांततेत तो त्यांच्या रोजच्या जागी बसला होता. त्याच्या आयुष्यातील आता पर्यंतचा एक मोठा निर्णय त्यानं घेतला होता. त्याला तिच्यात आणि कुटुंबात नं एकाला निवडायचं होतं. आणि त्याने तिला विसरायचं ठरवलं होतं. आई वडील आधी.
त्याने आकाशाकडे पहिले. लुक-लुक्त्या ताऱ्यांत तो तिला शोधात होता. तिच्या सोबत घालवलेल्या वेळेची आठवण करत त्याचे डोळे भरून आले. पहिल्या अश्रूला पुसत त्याने गाडी कडे पहिले. त्याचे मन अगदी भरून आले. एक एक तो क्षण हळू-हळू त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागला. तिची भेट. तिच्या मुळे हसणे. तिच्या सोबत एकांत.तिच्या आधी कुणीच इतकं जवळचं नव्हतं आणि या पुढे होणं हि शक्य दिसत नाही.
त्याचं मन त्याच्याशी वाद घालत होतं.
-का असे करतोयस?
-माझ्या समोर अजून कुठलाच पर्याय नाही आहे.
-तिच्या गेल्या नंतर, तिला विसरू शकशील का?
-का नाही?
-प्रश्नाच्या उत्तरात प्रश्न!
-मग काय बोलू?
-खरं
-खरं हेच आहे. आई-बाबांची इच्छा आहे. मी त्यांचं मन कसं मोडू?
-मग स्वतःचं काय? त्याचं काहीच नाही?
-नाही कसं! आहे की. माझ्या आयुष्यात तिची साथ इतकीच होती. आता तिला जावं लागेल.
-आणि तिचा विचार कोण करणार?
-मीच करीन. विचार केलाय. तो तिला नीट ठेवेल. माझा best friend आहे तो. मी ओळखतो त्याला. त्याला ती खूप आवडते. तिला ही तो आवडेल. तो मनाने खूप चांगला आहे.
-म्हणजे, तिच्या जाण्याने तू खुश आहेस तर...
-हो.
-मग खुश दिसत का नाही आहेस?
-मन भरून आलंय रे... आता ती माझी नसणार. ती माझी नाही आहे....या विचाराने मनावर किती वार होतात, काय सांगू?
-मग आता काय करायचं ठरवलंय?
-तिच्या आठवणीत जगणे. हे इतकं हे कठीण नाही आहे.
-हो रे... जमेल तुला.
-कसं जमणार नाही तेच पाहतो.... पण जेव्हा-जेव्हा तिची आठवण येईलना.... तेव्हा-तेव्हा डोळे भरून येतील. कधी असहाय्य झालं तर दुरूनच पाहीन तिला. किती छान वेळ घालवलेला आम्ही सोबत. तिला पहिल्यांदा पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो. आणि गम्मत म्हणजे... तिला हि मी आवडलो. मग काय.... कशाचीच परवाह नव्हती. आकाशातल्या पाखरांवानी सगळी कडे फिरायचो...समुद्र किनारी, डोंगरांन वर, गाव-खेड्यात... सगळी कडे. तिला हि ही सगळी ठिकाणं माझ्या सारखेच आवडतात. highway वर फिरण्याची वेगळीच मज्जा असायची. त्या मोकळ्या वाऱ्यात, त्याच्या सोबत. उन-पाऊस याची तर कधीच भीती नव्हती. एकदा ठरलं की ठरलं. हिवाळ्यातल्या पहाटेच्या वाऱ्यात....आणि पावसात ते चिंब भिजणं... तुला काय सांगू? किती बरं वाटतं तिच्या सहवासात. पावसात भिजणे आणि त्या माझ्या ओल्या हातातने तिला केलेला स्पर्श... शब्दच नाहीत बोलायला...
-आवर रे...
-हो. आवरायलाच हवंय. या पुढे असं काहीच नसणार.
उशीर होत होता. रात्र तिसऱ्या प्रहरात प्रवेश करत होती. त्याने गाडी कडे पहिले आणि एक दीर्घ श्वास सोडला.
दुसऱ्या दिवशी लवकर उठून तयारीला लागला . अंघोळ आणि नाश्ता होतोयचं तर राज, त्याचा मित्र, दारात उभा होता.
"अरे राज... ये-ये... नाश्ता कर..."
"नको रे. करून आलोय."
"मग... सगळी arrangement झाली का?"
"कुठे रे.... बाबा १५ हजारावर एक पैसा देत नाहीत. जेम-तेम २० हजार जमा झालेत."
"चालेल की... आपलं काय ठरलंय? तू ५ नंतर दे. ती तुझीच आहे."
"बस क्या यार..... ती आधी तुझी आहे. मग माझी. मी तिला कायद्यानं माझी बनवणार. नाही तर नको."
"कसला कायदा.... सोड ते सगळं. मी म्हणालोना ती तुझी आहे. मग कसले कायदे मांडतोयस?"
"thank you यार... तूच माझा खरा मित्र आहेस."
"anytime friend... anytime..."
"ए... पण कधी वाटलंना तर तू तिला बाहेर घेऊन जाऊ शकतोस."
"ह्म्म्म.... पण आता तो अधिकार तुझा आहे."
"तू तर असं म्हणतोयस जणू ती माझी लग्नाची बायकोच आहे!"
"अरे.... मग माझी तरी कुठे आहे?" दोघे जोरात हसायला लागले. kitchen मधून तेव्हड्यात आईचा आवाज आला.
"काय रे.... आज college ला उशीर नाही होत आहे का?" म्हणत आई hall मध्ये आली. "चला.. आवरा पटा-पट."
दोघांनी आपली bag उचलली आणि निघाले.
"हे घे... आता पासून हि तुझी..." असं म्हणत रोहनने राजच्या हातावर किल्ल्या ठेवल्या. "हि माझी लाडकी bike आहे रे... जपून चालव. हिला काही झालं तर गाठ माझ्याशी आहे. हीच तर माझी एकुलती एक darling आहे."
"तुझीच काय... आज पासून माझी पण darling. पण काय रे... तू हिला विकायला तयार कसा झालास? किती चांगल्या condition मध्ये आहे हि अजूनही. अगदी नव्यासारखी जपली आहेस."
"अरे... आई-बाबांना car घ्यायची आहे. मग bike कशाला ठेवावी? खिश्याला परवडणार नाही...petrol चे rates पाहिलेत का? किती महाग झालं आहे आली कडे."
"हो रे... म्हणूनच माझे बाबा पण विरोध करत होते."
"चला... आज पासून हिचे मालक तुम्ही. तर तूच चालव. मी मागे बसतो..." रोहन आणि राज bike वर बसले आणि college ला निघाले.
--परिणीता
(१--४-२०१२)

uitimate,really class.keep it up
ReplyDeleteThank you :)
ReplyDelete