“मैं और मेरी तनहाई अक्सर ये बातें करते है। तुम हो तो ये है। तुम हो तो वो है। मैं और मेरी तनहाई अक्सर ये बातें करते है।“
होना. तु आहेस म्हणुन माझी lipstick आहे. तु आहेस म्हणुन माझं makeup आहे. तु नाही तर पैसे ही नाही. काय झालं? विचारात पडलात ना. मी माझ्या boyfriend बद्धल नाही बोलत आहे. पण boyfriend हुन ही जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे, “ती”. सांगते कोणती. आधी तिची ओळख पटवते. पहील्यांदा घरा बाहेर पडताना आपल्या सोबत असते, “ती”. आई बाबां नंतर आपली सर्व गरजा पुरवते, “ती”. मित्र मैत्रीणीं नंतर सर्व खास गोष्ट जपते, “ती”. आपण जेव्हा किंवा जीच्या मुळे complete feel करतो, “ती”. कोण आहे “ती”! अजुनही नाही ओळखलत! हम्म्म....
खरं तर तिच्याशी माझंच काय तर सर्वांच रुणानुबंध आहे. आपण इतकं विचार करत नाही जितकी “ति” आपली काळजी घेते. एखाद्या दिवशी आपण डब्बा विसरलो तरीही चालेल पण तिला विसरुन घर कधीच सुटणार नाही. मला दिवसभर लागणरी प्रत्येक गोष्ट तिच्या कडे असते. मग ती कितीही लहान गोष्ट असो.
आता तरी समझले का? नाही! आहो, “ती” म्हणजे माझी bag! तुम्ही,आम्ही, आपण सर्वजण आपली bag न घेता घरा बाहेर पडु शकतच नाही. काय म्हणता... तुम्हाला नाही पटलं. बरं bag न घेता एक दिवस काढुन दाखवा. दिवस कसा जातो ते पहा. दिवसभरात कित्ती गोष्टी आपल्याला लागतात हे तेव्हाच कळतं. मग bag कशी ही असो. कधी ती school bag असते, कघी office bag, कघी hand bag तर कघी अपल्या आजीचा लहान बटवा. आहो, बटवा देखील bag च की आणी प्रत्येक जण आपल्या वया नुसार आपल्या bag ला घडवतो. हो, घडवतोच म्हणता येईल. म्हणजे बघा, छोटा पिंटु कींवा पिंकी आपल्या शाळेच्या bag ला जितक्या शिसतीत ठेवतात तितकेच ते शाळेतही शिस्त प्रिय वगतात. जितकी पुस्तके निट लावलेली असतात तितके चांगले marks कमवलेले असतात.
तसंच एका backbencher ची bag पहावी. बरं backbencher म्हणजे वर्गातील सर्वांत खोडकर व्यक्ती बद्धल म्हणतेय. या व्यक्तीच्या bag मध्ये एखादी वही सापडली तर उत्तम. पण त्यांच्या bag मध्ये अजून interesting गोष्टीहि सापडू शकतात.
एखाद्या तरुणीची bag अगदी तिच्या सारखी रंगीत असते. वयात आलेली पण मुद्दाम तो अल्लडपणा दाखवायचा असतो. Bag ची size जास्त मोठी नसते. पण इतकी मोठी असते की त्यात अत्या-आवश्यक असणारे makeup ठेवता येतं. Makeup म्हणजे किमान 2 रंगांच्या lipstick, 2 lipbalm, 2-3 eye liner, maskara, hair clip, hair band, hair spray, perfume, nail color, nail filer, उफ आणि बरंच काही. इतकंच नाही तर या मुली जमलं तर अक्खा कपाट त्या bag मध्ये घेऊन हिंडतील. तुम्हाला वाटेल, या सर्व गोष्टींची गरज पडते का? तर त्या डोळे मोठे करीत आणि आश्चर्य दाखवीत म्हणतील, " you may never know! केव्हा emergency असेल." यांची emergency म्हणजे पार्टी किंवा एखादी date.
मग अश्या वेळी असाच एक तरुण या तरुणीला date वर नेणार असतो. त्याच्या bag ची गोष्ट त्याच्या सारखीच असते. वरून दिसायला stylish पण आतून... या मुलांची bag त्यांच्या bike ला match होणारी असते. कारण college मधलं पाहिलं प्रेम bike वरच फुलतं. त्या bag मध्ये असते एक sunglasses आणि एक deo. अजून काय पाहिजे, आणि साहेब निघाले. असं म्हणता येईल, यांच्या पाकिटा सारखी यांची bag पण रिकामीच असते.
आता वय थोडं वाढवूया. म्हणजे नाव विवाहित... विवाहित दांपत्ती. यांच्या bags यांच्या घरासारख्या असतात. Table खुर्ची नसते यात पण घराचं एक mini version हे रोज bag मध्ये घेऊन फिरतात. अर्थात, दिवसात लागणारा जेवणाचा डब्बा, चहावर खाण्या करीता snacks चा डब्बा, मधल्या भूकेसाठी लहान डब्बा. फक्त डब्बेच नसतात. अजून बऱ्याच गोष्टी असतात.
जर ती पत्नी असेल तर, makeup तर आलंच. अडी अडचणीला लागणार पैस्यांचा राखीव कोटा. भाजी करिता extra पिशवी, उन्ह व पावसात लागणारी छत्री, स्वच्छता ठेवण्या करिता tissue napkins (सुखे आणि ओले दोनही प्रकारचे), प्रवास करताना गाडीत खाण्या करीत extra चमचा, केस विंचरायला कंगवा, गाडीतल्या मैत्रिणीं करीता खाऊचा डब्बा, कधी फळ कापून खाण्या करीता चाकू, इ. त्यात जमलं तर एक लहान ताट, वाटी, ग्लास आणि शक्य होईल तितकं kitchen रोज त्या बॅग मध्ये प्रवास करतं.
पतीच्या bag मध्ये त्याचा डब्बा, आणि.... डब्बा. फक्त डब्बाच कारण लग्नानंतर आयुष्यात कामा व्यतिरिक्त खाणं आणि झोपणं हेच कर्तव्य नवरा योग्य पार पाडतो.
वय थोडं पुढे सरलं कि कामातून नियुक्त होतो आणि आयुष्याची गाडी 5व्या gear वरून अचानक 1ल्या gear वर आल्या सारखी भासते. ते सकाळचं लवकर उठणं गरजेचं नसतं. रोजची ती प्रवासाची दगदग नसते. Office मधला boss नसतो आणि कामाची हि कटकट नसते. आयुष्य संथ लयीत असतं. मागे वळून पाहिलं की असं वाटतं आत्ताच तर college मधून बाहेर पडलो होतो. मग नोकरी, लग्न, मुलं.... सगळंच कसं पुस्तकाच्या पानांसारखं डोळ्यांदेखत निघून गेलं. आपली चिमुकली मुले आता त्यांच्या आयुष्याची जबाबदारी घेण्यास समर्थ झालीत. आता आपण बसून निवांत त्यांना पुढे जाताना पाहायचं. सगळंच कसं कालची गोष्ट वाटते.
कधी तरी आपण आजी-आजोबा अशी हाक मारत होतो, ती हाक आपल्या कानावर येते. आपल्या नात-नातू सोबत एक नवा प्रवास सुरु होतो. नकळत आपण आपली दुनिया परत एका बटव्यात सामावून घेतो.
त्या वेळी आपल्या आजी-आजोबांची आठवण येते. ते त्यांच्या बटव्यात, खाण्याचे पान, सुपारी, चुना, काथ, कांकोर्न, सुपारी फोडण्या करीत अडकिता आणि इथून तिथून जमवलेली काही नाणी आणि अजून काही लहान सहन गोष्टी जपून ठेवत असत. या वयात खरंतर कुठलंच शृंगार, धन किंवा अजून काही मोलाचं नसतं. सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे प्रेम. आजी-आजोबांना प्रेमाची भाषा आई-बाबांहून जरा जास्तच अवगते. ते निरागस प्रेम करतात. लहान मुलांसोबत पुन्हा लहान होतात. शरीर थकलेलं असलं तरी आपल्या मुलांना डोळ्यांदेखत वाढताना पाहून पुन्हा आयुष्य नव्याने जगू पाहतात.
पण एके दिवस तो शरीर थकतो, मग राहतात त्यांच्या आठवणी आणि त्या आठवणीत सापडतो तो बटवा. एका school bag पासून सुरु झालेला हा प्रवास या बटव्यात संपतो. यात साठवलेल्या आठवणी आणि प्रेम इथेच सोडून जातो.
---परिणीता
12/10/2018
No comments:
Post a Comment